Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद येथे गृहप्रमुख (बीएसडब्ल्यू/ एमएसडब्ल्यू तसेच दोन वर्षाचा गृहप्रमुख पदाचा अथवा तत्सम अनुभव असल्यास प्राधान्य) या एका पदासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च 3 लाख 9 हजार 925 रुपये तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राधानगरी येथे एक सफाई कामगार 11 महिन्यांच्या कालावधीसाठी एक लाख 30 हजार 152 रुपये अंदाजित खर्च असून वरील पदे भरावयाची आहेत. ही कामे गगनबावडा व राधानगरी तालुक्यातील असून याप्रमाणे कामे करण्यास इच्छुक तालुका, कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या कार्यरत व नमुद अटी व शर्ती पूर्ण करणा-या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी नमूद कंत्राटी पदांसाठी 28 ऑगस्ट 2024 च्या शासन निर्णयानुसार…
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : जिल्ह्यातील दुधगंगा, वारणा, राधानगरी व तुळशी हे मोठे प्रकल्प, कडवी, कासारी, कुंभी व धामणी हे मध्यम प्रकल्प तसेच लघु प्रकल्पांतर्गत नद्यांवर शासनाने बांधलेल्या को.प. बंधाऱ्यांमधून पाणी घेणाऱ्या सहकारी पाणीपुरवठा संस्था, वैयक्तिक बागायतदार आणि बिगरसिंचन ग्राहकांसाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १ जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या नियंत्रण कालावधीसाठी ठोक जलप्रशुल्क निश्चित केले आहे. दिनांक १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ या कालावधीसाठी सिंचन व बिगरसिंचन पाणी वापराचे सुधारित दर लागू राहतील. १ जुलै २०२७ ते ३० जून २०२८ या कालावधीत निर्धारित दरांमध्ये १० टक्के, तर १ जुलै २०२८ ते ३० जून २०२९ या…
कोल्हापूर, दि. ७ (जिमाका) : अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्कराच्या कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयामार्फत छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे १७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देतानाच देशसेवेची संधी मिळावी, हा या भरती मेळाव्याचा उद्देश आहे. या भरती प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स), अग्निवीर टेक्निकल (ऑल आर्म्स) तसेच अग्निवीर ट्रेड्समन (ऑल आर्म्स) १० वी व ८वी उत्तीर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग व रत्नागिरी तसेच गोवा राज्यातील उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यातील अधिवासी उमेदवार या भरतीसाठी…
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजीमार्फत आगाऊ दोन चाकी MH५१K ही नोंदणी मालिका 9 सप्टेंबरपासून नियमित सुरु करण्यात येत आहे. नवीन दोन चाकी MH५१K पसंती क्रमांकाचे अर्ज 9 व 10 सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ ते ३ या वेळेत कार्यालयात स्विकारण्यात येतील, अशी माहिती इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी दिली. वाहन नोंदणी क्रमांकांची मागणी करतेवेळी खालील सुचनांचे पालन करावे. पसंती नोंदणी क्रमांक घेण्यासाठी वाहनधारक हा हातकणंगले व शिरोळ तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मुळ रकमेचा डिमांड ड्राफ्ट (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश (Cheque) किंवा पेऑर्डर…
कोल्हापूर दि : 7 (जिमाका) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात कागल व आजरा तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांचा मॅरेथॉन आढावा आज घेतला. यावेळी बोलताना श्री मुश्रीफ म्हणाले, उत्तुर येथील बस स्थानकाचे प्रलंबित असलेले बांधकाम येत्या आठ दिवसात मार्गी लावावे.मौजे सिद्धनेर्ली येथील हरीजन सोसायटीचे ऑडिट पुन्हा एकदा नव्याने करून ती संस्था पुनर्जीवित करून घ्यावी.तसेच पुनर्जीवित प्रस्ताव डीडीआर (जिल्हा उपनिबंधक) मार्फत जेडीआर (सह जिल्हा निबंधक) ला पाठवावा. जिल्हा प्रशासनाच्या साह्याने कागल तालुक्यातील म्हाकवे येथील गावठाण वाडीतील प्लॉट स्थानिकांना देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. मौजे हणबरवाडी व तमनकवाडा येथील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर तयार करून ग्रामस्थांची सोय करावी.…
(पुणे):स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या हडपसर शाखेत कॉर्पोरेट शिस्तभंग, कंपनीच्या निधीचा अपहार आणि बनावट बिलांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील दक्षता पथकाने कडक पावले उचलली आहेत. या चौकशी अंती हडपसर शाखेचे वरिष्ठ अधिकारी विजय मिश्रा यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.माजी व्यवस्थापकाकडून पुणे न्यायालयात अनेक खटले दाखलमिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण केवळ अंतर्गत चौकशी पुरते मर्यादित नसून याला मोठा कायदेशीर वाद देखील जोडला गेला आहे. हडपसर शाखेचे माजी शाखा व्यवस्थापक विजय भोर यांनी विजय मिश्रा यांच्या विरोधात पुण्यातील फौजदारी आणि कामगार न्यायालयात आधीच अनेक गुन्हे व खटले दाखल केले आहेत.शाखेतील इतर सेल्स मॅनेजर्सही रडारवर; चौकशी प्रलंबित या धक्कादायक…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : आपत्ती व्यवस्थापनांतर्गत राज्य शासनाकडे सादर करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पूर सौम्यीकरण व भूस्खलन सौम्यीकरणासंदर्भातील कामांना प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दिल्या. कामे प्रस्तावित करताना संबंधित विभागांनी त्या कामांची आवश्यकता व उपयोगिता विचारात घेऊन प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब हजारे, विशेष प्रकल्प (सा.बा.) विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानसिंग पाटील, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वंदना थोरात,…
कोल्हापूर, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दावे व हरकतींच्या पुढील प्रक्रियेसाठी ‘Unmapped’ तसेच ‘Anomalies/Discrepancies in Mapping’ असलेल्या मतदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे. या कामकाजाच्या अनुषंगाने पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शीतल तेली- उगले, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम दौरा बुधवार, 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्यात मतदार यादी निरीक्षकांकडून विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून…
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : परिवहन विभागातील मालवाहतूक वाहनांसाठी जुनी नोंदणी मालिका MH-०९-GJ ही लवकरच संपणार आहे. त्यानंतर नवीन मालवाहतूक नोंदणी मालिका MH-०९-HK करिता 7 सप्टेंबरपासून कामकाज सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत परिवहन विभाग खिडकी क्रमांक 2 येथे स्विकारण्यात येतील. वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करते वेळी खालील सुचनांचे पालन करावे- पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पेऑर्डर अर्जासोबत देवू नये. डिमांड ड्राफ्ट काढताना REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR या नावानेच काढलेला असावा.…
कोल्हापूर, दि. ३ (जिमाका): केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नात्यांतर्गत दत्तक व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेतील ८ प्रकरणांना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मान्यतेने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे बालकांचे पालकत्व प्राप्त झाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही प्रक्रिया पूर्ण केली. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रथम CARA संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली. दत्तक घेणारे व दत्तक देणारे पालक तसेच संबंधित बालकांची आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांची छाननी करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी दत्तक…