Author: admin

कोल्हापूर दि : 2 (जिमाका) युवकांमध्ये तंबाखू सेवनास प्रतिबंध करणे,तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘तंबाखू मुक्त युवा अभियान ४.०’ राबविण्यात येत आहे. या ६० दिवसीय देशव्यापी अभियानाचा शुभारंभ नुकताच नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रभावी उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून, जिल्ह्यातील पोलीस विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने, जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी ‘कोटपा २००३’ (COTPA 2003 – सिगारेट…

Read More

कोल्हापूर दि : 2 (जिमाका) वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या 1100 बेड,600 जनरल बेड,250 कॅन्सर व 250 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामासह सांगाव येथील आयुर्वेदिक / होमिओपॅथिक , उत्तुर येथील शासकीय योग व निसर्गोपचार तसेच CPR रुग्णालयाती प्रलंबित कामकाजाचा आढावा श्री मुश्रीफ यांनी आज घेतला. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड,उप अधीक्षक डॉ.गिरीष कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, या ठिकाणी सुरू असलेली बांधकामे…

Read More

कोल्हापूर, दि.२९ (जिमाका) : कोल्हापूर वन विभागाने गेल्या वीस दिवसांत लोकसहभागातून वनक्षेत्रात ४५० वनराई बंधारे उभारले असून, त्यामुळे सुमारे तीन कोटी लीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. एक हजार बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाचे विविध उपाय करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या उपक्रमाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती तसेच वन्यजीव सप्ताहाच्या प्रारंभाच्या दिवशी करण्यात आली. या अभियानातून जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश पोहोचवण्यात आला. या अभियानात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त…

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता महाडीबीटी 2.0 या अद्ययावत ऑनलाइन प्रणालीवर शिष्यवृत्ती फ्रीशीप अर्ज नोंदणी करण्याची कार्यवाही विद्यार्थ्यांनी तातडीने करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सन 2018-19 पासून सामाजिक न्याय विभागाच्या सर्व शिष्यवृत्ती योजनांचे कामकाज महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. आता हे पोर्टल ‘महाडीबीटी 2.0’ या नव्या स्वरूपात अद्ययावत करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती व शैक्षणिक योजनांचा लाभ घेता येणार आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यासह शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क…

Read More

कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत कर्ज घेतलेल्या व थकबाकीदार असलेल्या लाभार्थ्यांसाठी एकरकमी परतावा (ओटीएस) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा केल्यास थकीत व्याजाच्या ५० टक्के रकमेची सवलत देण्यात येणार आहे. ही योजना ३१ मार्च २०२७ पर्यंत लागू असून, पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ हा राज्य शासनाच्या पूर्ण मालकीचा उपक्रम असून, महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविण्यात येतात. महामंडळाकडून वितरित करण्यात आलेल्या कर्जाची…

Read More

कोल्हापूर, दि. २९ (जिमाका) : माजी सैनिक, विधवा व अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासह त्यांना कल्याण व पुनर्वसनाच्या विविध योजना आणि सवलतींची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कल्याण संघटकांचे नोव्हेंबर महिन्यातील सुधारित मासिक दौरे आयोजित करण्यात आले आहेत. संबंधित तालुक्यांतील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा व अवलंबितांनी या दौऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे यांनी केले आहे. या दौऱ्यांतर्गत शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, गडहिंग्लज येथे, बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, चंदगड येथे, तर शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय, आजरा येथे कल्याण संघटक उपस्थित राहणार आहेत. हे दौरे संबंधित तहसीलदारांच्या कार्यालयात आयोजित…

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : माहे नोव्हेंबरचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवारी म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा. शासन परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वानुसार अर्ज स्वीकारले जातील. तसेच सकाळी 11 ते दुपारी 1 पर्यंत अर्ज स्विकारले जातील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली . तालुकास्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक…

Read More

कोल्हापूर, दि.२८ (जिमाका) : कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिके आणि प्रमाणित बियाणे वितरण हा घटक राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ७८० हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार असून, पात्र शेतकरी गटांना अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरित करण्यात येणार आहे. पीक प्रात्यक्षिक घटकांतर्गत शेतकरी गटातील लाभार्थी शेतकऱ्यांना किमान ०.४० हेक्टर मर्यादेत 100 टक्के अनुदानावर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये बियाणे, बीजप्रक्रिया, पीक संरक्षण निविष्ठा, माती नमुने तपासणी, प्रशिक्षण व प्रशिक्षण साहित्य आदी बाबींचा समावेश आहे. रब्बी ज्वारी प्रमाणित बियाणे वितरणासाठी पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना…

Read More

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका) : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय पन्हाळा येथे नुकतेच महसूल लोक अदालतीचे आयोजन पार पडले . या लोक अदालतीसाठी एकूण ४५ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते. यातील ३० प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड सादर केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १४२ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती तहसिलदार माधवी शिंदे यांनी दिली. महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे…

Read More

कोल्हापूर विभागातील 570 टपाल कार्यालयांत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध कोल्हापूर दि 28 (जिमाका) : दिवाळी हा भारतातील सर्वांत मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. दिवाळी म्हटले की घराघरांत तयार होणारा स्वादिष्ट फराळ, कुटुंबीयांची भेट आणि आनंदाचे वातावरण यांची आठवण होते. मात्र, शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या अनेक नागरिकांना दिवाळीच्या सणात आपल्या घरच्या फराळाची विशेष आठवण येते. अशा नागरिकांना आपल्या परदेशातील नातेवाईकांना दिवाळीचा फराळ पाठविता यावा, यासाठी भारतीय डाक विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोल्हापूर डाक विभागांतर्गत एकूण 570 टपाल कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या घरातील तयार फराळ,…

Read More