(पुणे):स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीच्या हडपसर शाखेत कॉर्पोरेट शिस्तभंग, कंपनीच्या निधीचा अपहार आणि बनावट बिलांद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मुख्य कार्यालयातील दक्षता पथकाने कडक पावले उचलली आहेत. या चौकशी अंती हडपसर शाखेचे वरिष्ठ अधिकारी विजय मिश्रा यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.माजी व्यवस्थापकाकडून पुणे न्यायालयात अनेक खटले दाखलमिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण केवळ अंतर्गत चौकशी पुरते मर्यादित नसून याला मोठा कायदेशीर वाद देखील जोडला गेला आहे. हडपसर शाखेचे माजी शाखा व्यवस्थापक विजय भोर यांनी विजय मिश्रा यांच्या विरोधात पुण्यातील फौजदारी आणि कामगार न्यायालयात आधीच अनेक गुन्हे व खटले दाखल केले आहेत.शाखेतील इतर सेल्स मॅनेजर्सही रडारवर; चौकशी प्रलंबित या धक्कादायक प्रकरणात केवळ विजय मिश्राच नव्हे, तर हडपसर शाखेतील काही सेल्स मॅनेजर्स देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पैशांच्या आमिषाने आणि वैयक्तिक आर्थिक लाभासाठी स्टार एजंट्सच्या बेकायदेशीर बदल्या करण्याच्या गैरप्रकारात या सेल्स मॅनेजर्सचा थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे. या संबंधित सेल्स मॅनेजर्सची अंतर्गत चौकशी अद्याप प्रलंबित असून, त्यांच्यावरही लवकरच कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, अनेक माजी सेल्स मॅनेजर्सनी मिश्रा यांच्या विरोधात केलेल्या जुन्या तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत.एजंट्सच्या निधीचा गैरवापर आणि फसवणूक विजय मिश्रा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत कंपनीच्या ‘स्टार एजंट्स’चा मोठा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा आणि त्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.कारवाईसाठी निश्चित करण्यात आलेली मुख्य कारणे:न्यायालयीन खटले आणि तक्रारी: माजी शाखा व्यवस्थापक विजय भोर आणि माजी सेल्स मॅनेजर्सनी विविध अंतर्गत गैरप्रकारांबद्दल न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.आर्थिक अपहार आणि बनावट बिले: एजंट्सच्या निधीचा गैरवापर करणे आणि बनावट बिले सादर करून कंपनीची मोठी आर्थिक कोंडी करणे.आर्थिक लाभासाठी अंतर्गत बदल्या: एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर व्यवहार करणे (ज्यामध्ये इतर सेल्स मॅनेजर्सची चौकशी सुरू आहे). तात्काळ बडतर्फी अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानंतर आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन, कंपनी प्रशासनाने विजय मिश्रा यांना तात्काळ प्रभावाने सेवेतून बडतर्फ केले आहे. या कारवाईमुळे विमा क्षेत्रात आणि हडपसर परिसरातील कॉर्पोरेट वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
