
कोल्हापूर, दि. 4 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दावे व हरकतींच्या पुढील प्रक्रियेसाठी ‘Unmapped’ तसेच ‘Anomalies/Discrepancies in Mapping’ असलेल्या मतदारांची सुनावणी घेण्यात येणार आहे.
या कामकाजाच्या अनुषंगाने पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांसाठी शीतल तेली- उगले, विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम दौरा बुधवार, 9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
दौऱ्यात मतदार यादी निरीक्षकांकडून विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून BLO तसेच मतदारांशी चर्चा करण्यात येणार आहे. मतदार यादी निरीक्षकांच्या या दौऱ्यामुळे SIR अंतर्गत मतदार नोंदणी, मतदारांच्या नोंदींची अचूकता, ‘Unmapped’ आणि विसंगती असलेल्या नोंदींची पडताळणी तसेच दावे-हरकती प्रक्रियेचा आढावा घेण्यास मदत होणार आहे. या दौऱ्याचे संपर्क अधिकारी म्हणून श्रीमती तेजस्विनी खोचरे पाटील, तहसीलदार तथा करमणूक कर अधिकारी, (मोबाईल- 9822784669) जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून प्रस्थान. 9.30 वाजता उदगाव तालुका शिरोळ येथे आगमन. 280- शिरोळ विधानसभा मतदार संघामधील मतदान क्रमांक 35 उदगाव कन्या विद्या मंदिर येथे पाहणी. बीएललो व मतदारांशी चर्चा.
सकाळी 9.30 ते 9.50 वाजता उदगाव येथून जयसिंगपूरकडे प्रयाण व आगमन. 280 वि.स.म. संघ मधील मतदान क्रमांक 66 जयसिंगपूर जनतारा कल्पवृक्ष विद्यालय खोली नंबर 2 येथे पाहणी. बीएलओ व मतदारांची चर्चा.
सकाळी 9.50 ते 10.10 वाजता जयसिंगपूर येथील 280 शिरोळ वि.म. संघ मधील मतदान क्रमांक 92 जयसिंगपूर बळवंतराव झेले हायस्कूल, खोली नं. 5 येथे पाहणी. बीएलओ व मतदारांशी चर्चा.
सकाळी 10.10 ते 11.30 वाजता जयसिंगपूर येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण व आगमन. विद्यमान खासदार, आमदार आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत बैठक.
सकाळी 11.30 ते 11.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय 276- कोल्हापूर उत्तर व 274- दक्षिण इआरओ कार्यालयांना भेटी.
सकाळी 11.45 ते 12.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सानेगुरुजी वसाहतकडे प्रयाण व आगमन. 274 कोल्हापूर दक्षिण मतदान केंद्र क्र. 2 व 3 (वसंतराव देशमुख हायस्कुल) पाहणी. बीएलओ व मतदारांशी चर्चा.
दुपारी 12.10 ते 12.45 वाजता सानेगुरुजी वसाहत येथून कसबा बावडाकडे प्रयाण व आगमन. 276 कोल्हापूर उत्तर मतदान केंद्र क्र.4 (पांडुरंग उलपे सभागृह) पाहणी. बीएलओ व मतदारांशी चर्चा.
दुपारी 12.45 ते 1 वाजता कसबा बावडा येथून ताराराणी चौककडे प्रयाण व आगमन. 276 कोल्हापूर उत्तर मतदान केंद्र 5 (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) पाहणी व आगमन. बीएलओ व मतदारांशी चर्चा.
दुपारी 1 ते 1.30 वाजता ताराराणी चौक येथून घुणकी, ता. हातकंणगलेकडे प्रयाण व आगमन. 278- हातकणंगले मतदान केंद्र 17 (कन्या विद्या मंदिर घुणकी) पाहणी. बीएलओ व मतदारांशी चर्चा.
दुपारी 1.30 ते 1.50 वाजता घुणकी येथून किणी, ता. हातकणंगलेकडे प्रयाण व आगमन. 278- हातकणंगले मतदान केंद्र क्र. 47 (अंगणवाडी क्र. 24 किणी) पाहणी. बीएलओ व मतदारांशी चर्चा.
दुपारी 1.50 वाजता किणी येथून कराड/साताराकडे प्रस्थान.
0000