
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : परिवहन विभागातील मालवाहतूक वाहनांसाठी जुनी नोंदणी मालिका MH-०९-GJ ही लवकरच संपणार आहे. त्यानंतर नवीन मालवाहतूक नोंदणी मालिका MH-०९-HK करिता 7 सप्टेंबरपासून कामकाज सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत परिवहन विभाग खिडकी क्रमांक 2 येथे स्विकारण्यात येतील.
वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करते वेळी खालील सुचनांचे पालन करावे-
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पेऑर्डर अर्जासोबत देवू नये. डिमांड ड्राफ्ट काढताना REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR या नावानेच काढलेला असावा. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच Demand Draft (धनाकर्ष) 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 ते 3 यावेळेतच कार्यालयात सादर करावा.
7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या सिंगल डी. डी. व लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराने नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मागणी केलेला नोंदणी क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने 8 सप्टेंबर रोजी जादा रकमेचा एकच स्वतंत्र Demand Draft (धनाकर्ष) बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते दुपारी 3.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहिल. एकापेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव 8 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल.
आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला संलग्न असलेलाच मोबाईल नंबर व पत्ता अर्जावर लिहावा, अर्जावर मोबईल नंबर लिहला नसल्यास आपला कोणताही हक्क आकर्षक क्रमांकावर राहणार नाही. विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही.
वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फीचा धनाकर्ष वाहनधारकाने फीची खात्री करूनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनाकर्ष घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सध्या सुरु असलेली परिवहन विभागातील मालवाहतूक GJ मधील उर्वरित क्रमांक संपल्यानंतर नवीन मालिका HK फॅन्सी नंबर पोर्टलवर प्रदर्शित करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
0000