Author: admin

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अद्ययावत करून ‘महाडीबीटी २.०’ या नवीन स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपचे अर्ज नोंदणी करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नव्या प्रणालीवर आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. सन २०१८-१९ पासून महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे कामकाज सुरू आहे. आता नवीन महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाच्या आधारे नवीन महाआयडी तयार करणे बंधनकारक आहे. आधार पोर्टलवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि…

Read More

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना स्वयं-सहायता समूहांशी जोडणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश होता. नवीन स्वयं-सहायता समूहांच्या स्थापनेसाठी ऐनी व ठीकपुर्ली येथे वर्धिनी फेरी, तर तुरंबे, आवळी बुद्रुक, शिरगाव, नरतवडे, कासारपुतळे, तारळे खुर्द, पंडेवाडी व अटेगाव आदी गावांमध्ये ग्रामसखी फेरीचे आयोजन करण्यात आले. सुळंबी येथे आयोजित आरोग्य शिबिरात समूहातील ५६ महिलांनी सहभाग घेतला. तसेच तालुक्यातील…

Read More

कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात आरोग्य विभागामार्फत ८९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात १६६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण ७ हजार २१ नागरिकांना विविध आरोग्यविषयक सेवा देण्यात आल्या. या अभियानांतर्गत पाच रक्तदान शिबिरांमध्ये १९७ जणांनी सहभाग घेतला. तसेच २१८ आभा कार्ड, ७५ गोल्डन कार्ड आणि १२५ वयोवंदना कार्ड तयार करण्यात आले. याशिवाय ३६८ जणांची रक्त तपासणी, ५५ जणांची नेत्र तपासणी आणि ५ हजार ३०४ जणांची असंसर्गजन्य आजारांची (एनसीडी) तपासणी करण्यात आली. १४० ईसीजी आणि १५२ एक्स-रे तपासण्याही करण्यात आल्या. तसेच १३ नागरिकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष शिबिरात…

Read More

कोल्हापूर, दि.१७ (जिमाका) : महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आजरा तहसील कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यासह विविध विभागांच्या योजनांची माहिती व आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमात महसूल, आरोग्य, सेतू, पंचायत समिती, महावितरण, पशुसंवर्धन आणि नगरपंचायत आदी विभागांनी सहभाग घेतला. तहसीलदार समीर माने यांनी उपस्थित नागरिकांना सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली. महसूल विभागामार्फत ३५ लाभार्थ्यांना सातबारा उतारे, ४२ लाभार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर दाखले, २८ लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, ६ लाभार्थ्यांना जातीचे दाखले, तर २३ लाभार्थ्यांना ई-रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. विविध विभागांच्या सहभागातून नागरिकांना…

Read More

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 19 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत SSB कोर्स क्र. 67 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर रहावे. या कोर्स कालावधील प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील SSB -67…

Read More

पौष्टिक आहारातून निरोगी जीवनशैलीचा संदेश; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : सेवा संकल्प अभियान व पोषण माहनिमित्त गारगोटी, ता. भुदरगड येथे भरड धान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी स्पर्धेला भेट देऊन सहभागी महिला व नागरिकांशी संवाद साधला. भरड धान्याचा आहारातील वापर वाढवून पौष्टिक व संतुलित आहाराच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेत महिलांनी भरड धान्यापासून विविध पौष्टिक व रुचकर पदार्थ तयार करून सादर केले. दैनंदिन आहारात भरड धान्याचा समावेश केल्यास कुटुंबाच्या पोषण व आरोग्याला चालना मिळते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. 0000

Read More

स्थानिक साधनसामग्रीचा वापर; महिलांना रोजगाराची संधी, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत पन्हाळा तालुक्यातील केखले येथील रेणुका महिला बचत गटाने उदबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून उदबत्ती निर्मितीला सुरुवात केल्याने महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. महिलांनी एकत्रितपणे उदबत्ती निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली. तयार करण्यात आलेल्या उदबत्त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जात आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप मिळाले असून, कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्याबरोबरच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यात निर्माण…

Read More

कोल्हापूर, दि. २ (जिमाका) : शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी-केंद्रित, कृतीआधारित तसेच स्थानिक गरजांशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच समाजाच्या सहभागातून जनजागृती करण्यावर या उपक्रमांतून भर देण्यात येत आहे. ‘विकसित भारत’या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे तसेच व्हिडिओंचे तालुका व जिल्हास्तरावर प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये हे उपक्रम घेण्यात येत आहेत. अभियानांतर्गत २ ऑक्टोबर रोजी तालुकास्तरावर मानवी रांगोळी…

Read More

कोल्हापूर, दि. 1 (माध्यम कक्ष) : महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक-2026 च्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियात प्रसारित करण्यात येणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी सदर जाहिराती प्रमाणित करूनच प्रसारित कराव्यात. तसेच, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनीही जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबीची खात्री करुन घ्यावी. टीव्ही, केबल नेटवर्क/ केबल चॅनेल्स, सिनेमा हॉल्स, आकाशवाणी, रेडिओ, एफएम वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या ऑडिओ-व्हिडीओ व्हिज्युअल्स जाहिराती, ई न्यूजपेपरवरील जाहिराती, बल्क एसएमएस किंवा व्हॉईस मेसेजेस, सोशल…

Read More

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी सेवा रुग्णालय, कसबा बावडा या ठिकाणी मानसिक आरोग्य ताणतणाव मुक्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मानसिक आजार असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. हे शिबीर स. 9 ते दु. 1 या वेळेत होणार आहे. मानसिक आजार असलेल्या रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे. **

Read More