
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी सेवा रुग्णालय, कसबा बावडा या ठिकाणी मानसिक आरोग्य ताणतणाव मुक्ती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मानसिक आजार असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे. हे शिबीर स. 9 ते दु. 1 या वेळेत होणार आहे.
मानसिक आजार असलेल्या रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे.
**
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.