
कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतींसाठी 19 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत SSB कोर्स क्र. 67 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या मोफत प्रशिक्षणासाठी 12 ऑक्टोबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे मुलाखतीस हजर रहावे.
या कोर्स कालावधील प्रशिक्षणार्थीना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावर सर्च करुन त्यामधील SSB -67 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत आणावयची आहे.
एस.एस.बी. वर्गामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्या संबंधिची पात्रता प्रशिक्षण प्रमाणपत्र वर्गाला येताना सोबत घेवून यावे.
कम्बाइंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स अकादमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वॉर्टर एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉटसअॅप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर मार्फत करण्यात आले आहे.
000000