
कोल्हापूर, दि.१७ (जिमाका) : महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आजरा तहसील कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यासह विविध विभागांच्या योजनांची माहिती व आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
या उपक्रमात महसूल, आरोग्य, सेतू, पंचायत समिती, महावितरण, पशुसंवर्धन आणि नगरपंचायत आदी विभागांनी सहभाग घेतला. तहसीलदार समीर माने यांनी उपस्थित नागरिकांना सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली.
महसूल विभागामार्फत ३५ लाभार्थ्यांना सातबारा उतारे, ४२ लाभार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर दाखले, २८ लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, ६ लाभार्थ्यांना जातीचे दाखले, तर २३ लाभार्थ्यांना ई-रेशन कार्डचे वितरण करण्यात आले.
विविध विभागांच्या सहभागातून नागरिकांना शासकीय सेवा, योजनांचा लाभ आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचविणे आणि प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
000000