Author: admin

कोल्हापूर, दि. 04 (जिमाका): जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती दि.05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे एक दिवस अगोदर दि. 06 फेब्रुवारी 2026 आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 07 फेब्रुवारी 2026 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी 07 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या तरतुदीनुसार जाहीर प्रचाराची मुदत मतदान सुरु होण्याच्या चोवीस तास आधी संपेल. तसेच निवडणूक काळातील जिल्ह्यात 5 फेब्रुवारी रात्री 10 पासून जमावबंदी लागू आहे. त्यामुळे…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 साठीचा प्रारंभिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये मतदानाचा दिनांक गुरुवार, दि. 05 फेब्रुवारी 2026 असा निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सर्व मतदारांना मतदार चिठ्ठी लवकरात लवकर वितरीत करणे आवश्यक असल्याने मा. राज्य निवडणूक आयोगाच्या त्या वेळच्या कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 05 फेब्रुवारी असे नमूद करून दि. 26 व 27 जानेवारी 2026 रोजी मतदान निहाय मतदार चिठ्ठी प्रिंट करण्यात येऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत मतदार चिठ्ठ्यांचे आगाऊ स्वरुपात वाटप करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती सार्वत्रिक…

Read More

कोल्हापूर दि. 4 (जिमाका): राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर तसेच आरोग्य उपकेंद्र शिरदवाड व हेरवाड यांनी राज्यस्तरीय मूल्यांकनात यश संपादन केले असून, आता ही केंद्रे राष्ट्रीय स्तरावरील अंतिम प्रमाणपत्रासाठी पात्र ठरली आहेत. गुणवत्तापूर्ण उपचार, रुग्ण सुरक्षा, संसाधन व्यवस्थापन आणि अद्ययावत स्वच्छता या निकषांवर कोल्हापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर तसेच आरोग्य उपकेंद्र शिरदवाड व हेरवाड या केंद्रांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. ही योजना चार टप्यामध्ये राबविण्यात येते. पहिला टप्पा स्वमुल्याकंन, दुसरा टप्पा जिल्हास्तरीय मुल्याकंन, तिसरा टप्पा राज्यस्तरीय मुल्यांकन व चौथा टप्पा राष्ट्रीय मुल्यांकन. विशेष यश: कायाकल्प योजना २०२५ जिल्हा गुणवत्ता आश्वासन उपक्रमांतर्गत ‘कायाकल्प’ योजनेत…

Read More

कोल्हापूर दि. 4 (जिमाका): 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगार मतदारांना व निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी 7 फेब्रुवारी रोजी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पुर्ण…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 12 पंचायत समितीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मतदान शनिवार, 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतदान केंद्रावर मतदान कर्तव्य बजावण्यासाठी मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळेतील अधिकारी/कर्मचारी यांचा समावेश आहे. मतदान कर्तव्याकरिता नियुक्त मतदान पथकांना शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून संबंधित तालुका स्तरावरून निवडणूक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. साहित्य घेऊन मतदान पथकांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून पोहोचण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कार्यरत सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची जिल्हा…

Read More

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका): मराठा बटालीयन, औंध मिलिटरी तळ यांच्यामार्फत स्वराज्याचे शिलेदार वीर तानाजी मालुसरे यांचे सिंहगडच्या लढाईतील (1670) अत्युच्च शौर्य व बलिदानाचे तसेच मराठा वीरांच्या असीम त्याग, पराक्रम व गौरवशाली वारशाचे स्मरण करण्याच्या हेतूने 4 फेब्रुवारी रोजी ‘मराठा दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पर्वत ते सागर’ अशी सायकल मोहिम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, एक JCO व 15 OR सहभागी होणार आहेत. या यात्रेदरम्यान सायकलपटूंसाठी पाण्याची व्यवस्था, यात्रेच्या मार्गावरील ट्रॅफिक नियोजन व आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच यात्रामार्गावर वैद्यकीय पथक (रुग्णवाहिकेसह) उपस्थित राहणार आहे. ही सायकल यात्रा सिंहगड किल्ला, पुणे येथून…

Read More

कोल्हापूर दिनांक 02 – जुना बुधवार पेठेतील जाणारा धोकादायक हायवे,अलिकडे झालेले अपघात, वाढलेली वाहतूक व्यवस्था,नवीन होणाऱ्या उड्डाणं पूल, स्थानिक नागरिक शाळेतील मुले यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत येत नाही यावर सविस्तर निर्णय घेण्यासाठी जुना बुधवार पेठेतील स्थानिक रहिवाश्यांनी मिटिंगचे आयोजन केले होते. या वेळी मिटिंग चे अध्यक्ष माजी महापौर महादेवराव आडगुळे साहेब यांच्या अध्यक्षते खाली मिटिंग पार पडली.यावेळी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जुना बुधवार पेठेच्या मुख्य रस्ता हा रत्नागिरी हायवे ला जोडणारा असल्याने या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा होत असते.त्यात अवजड वाहनांचा सुद्धा जास्त समावेश असल्याने येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले असून…

Read More

कोल्हापूर दिनांक 1 -सांगरूळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील काँग्रेस उमेदवारांसाठी आमदार जयंत आसगावकर यांच्यासह सांगरूळ येथे प्रचारसभा घेतली. सांगरूळ परिसर हा नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा राहिला आहे. स्वर्गीय बोंद्रे दादा, पी. एन. पाटील साहेब, स्वर्गीय मारुती खाडे साहेब यांच्यासारख्या निष्ठावान नेत्यांनी काँग्रेसचा विचार जिवंत ठेवला. काँग्रेसचा हाच विचार पुढे नेण्यासाठी माझी लढाई सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. पी. एन. साहेबांच्या माघारी विकासकामांसाठी सांगरूळ दत्तक घेणार असून गावाला निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास ग्रामदैवत जोतिबाच्या साक्षीने व्यक्त केला. यावेळी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे, तसेच शिवाजीराव खाडे, प्रशांत नाळे, पन्हाळा…

Read More

कोल्हापूर दिनांक 27 – जुना बुधवार पेठ येथील राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याने दोन बहिणी जिवंत असताना ती माहिती लपवून खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाची फसवणूक करून 2384 डी वॉर्ड जुना बुधवार पेठ येथील वडिलोपार्जित मालमत्ता नावावर केल्याने राजेंद्र मोहिते पाटील व अन्य दोन साक्षीदारांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याला जयश्री आणि मृणाल या दोन बहिणी असताना वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित मालमत्ता नावावर करताना त्याने तो स्वतः व त्याचा भाऊ महेंद्र हे दोघेच वारस असून अन्य कोणीही वारस नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते.याबाबत कोर्टाने लक्ष्मीपुरी पोलिसांकडून कलम 202 अन्वये अहवाल मागविला होता.पोलिसांनी त्यामध्ये…

Read More

कोल्हापूर दिनांक 31 – आज पहाटे ऊस भरून चाललेला ट्रॅक्टर भर चौकात पलटी झाला.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाण्याची पाईप लाईन फुटून पाणी बेसमेंट मध्ये घुसलेने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.त्यामुळे जुना बुधवार पेठेतील मुख्य मार्गावर वारंवार अपघात होऊ लागल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. जुना बुधवार पेठेतून साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर तसेच इतर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे.आधीच दाटीवाटीचे रस्ते त्यात ग्रामीण भागातून येणारी वाहने यामुळे आधीच या भागातील नागरिक त्रस्त आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी ट्रक खाली सापडून मृत्यू झाला आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.त्यामुळे…

Read More