कोल्हापूर दिनांक 27 – जुना बुधवार पेठ येथील राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याने दोन बहिणी जिवंत असताना ती माहिती लपवून खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाची फसवणूक करून 2384 डी वॉर्ड जुना बुधवार पेठ येथील वडिलोपार्जित मालमत्ता नावावर केल्याने राजेंद्र मोहिते पाटील व अन्य दोन साक्षीदारांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याला जयश्री आणि मृणाल या दोन बहिणी असताना वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित मालमत्ता नावावर करताना त्याने तो स्वतः व त्याचा भाऊ महेंद्र हे दोघेच वारस असून अन्य कोणीही वारस नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र शासनाला सादर केले होते.याबाबत कोर्टाने लक्ष्मीपुरी पोलिसांकडून कलम 202 अन्वये अहवाल मागविला होता.पोलिसांनी त्यामध्ये राजेंद्र मोहिते पाटील याने दोन बहिणी जिवंत असताना ती माहिती लपवल्याने गुन्हा दाखल होत असल्याबाबत कोर्टाला कळविले होते.त्यानुसार कोर्टाने तिघांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.या खटल्याचे काम ॲड. कुणाल पाटील पाहत आहेत.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
