कोल्हापूर दिनांक 31 – आज पहाटे ऊस भरून चाललेला ट्रॅक्टर भर चौकात पलटी झाला.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी पाण्याची पाईप लाईन फुटून पाणी बेसमेंट मध्ये घुसलेने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.त्यामुळे जुना बुधवार पेठेतील मुख्य मार्गावर वारंवार अपघात होऊ लागल्याने या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे.
जुना बुधवार पेठेतून साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टर तसेच इतर अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे.आधीच दाटीवाटीचे रस्ते त्यात ग्रामीण भागातून येणारी वाहने यामुळे आधीच या भागातील नागरिक त्रस्त आहेत.त्यातच काही दिवसांपूर्वी ट्रक खाली सापडून मृत्यू झाला आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.त्यामुळे पोलिस प्रशासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
