कोल्हापूर दिनांक 1 -सांगरूळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील काँग्रेस उमेदवारांसाठी आमदार जयंत आसगावकर यांच्यासह सांगरूळ येथे प्रचारसभा घेतली. सांगरूळ परिसर हा नेहमीच काँग्रेसच्या विचारांचा राहिला आहे. स्वर्गीय बोंद्रे दादा, पी. एन. पाटील साहेब, स्वर्गीय मारुती खाडे साहेब यांच्यासारख्या निष्ठावान नेत्यांनी काँग्रेसचा विचार जिवंत ठेवला. काँग्रेसचा हाच विचार पुढे नेण्यासाठी माझी लढाई सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. पी. एन. साहेबांच्या माघारी विकासकामांसाठी सांगरूळ दत्तक घेणार असून गावाला निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास ग्रामदैवत जोतिबाच्या साक्षीने व्यक्त केला. यावेळी गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष य. ल. खाडे, तसेच शिवाजीराव खाडे, प्रशांत नाळे, पन्हाळा तालुका काँग्रेस अध्यक्ष निवास पाटील, उत्तम देसाई, ए. के. पाटील, डी. जे. खाडे, पा.वी.पाटील, सागर भूमकर, उमेदवार सौ. शितल यादव, दिपाली नाळे, शोभा पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
