कोल्हापूर दिनांक 02 – जुना बुधवार पेठेतील जाणारा धोकादायक हायवे,अलिकडे झालेले अपघात, वाढलेली वाहतूक व्यवस्था,नवीन होणाऱ्या उड्डाणं पूल, स्थानिक नागरिक शाळेतील मुले यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत येत नाही यावर सविस्तर निर्णय घेण्यासाठी जुना बुधवार पेठेतील स्थानिक रहिवाश्यांनी मिटिंगचे आयोजन केले होते. या वेळी मिटिंग चे अध्यक्ष माजी महापौर महादेवराव आडगुळे साहेब यांच्या अध्यक्षते खाली मिटिंग पार पडली.यावेळी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जुना बुधवार पेठेच्या मुख्य रस्ता हा रत्नागिरी हायवे ला जोडणारा असल्याने या मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये जा होत असते.त्यात अवजड वाहनांचा सुद्धा जास्त समावेश असल्याने येथील रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले असून जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत असल्याची परिस्थिती आहे.त्यातच अलीकडे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.त्यानुसार प्रशासन , लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करून पर्यायी मार्गाची लवकरात लवकर व्यवस्था व्हावी यासाठी रस्ते सुरक्षा समिती मार्फत प्रयत्न केले जाणार आहेत.सर्व खासदार, आमदार, कलेक्टर आयुक्त यांना भेटून निवेदन देऊन या विषयांचे गांभीर्य पटवून हा विषय लवकर मार्गी लावण्याचे या मीटिंग मध्ये ठरले.तसेच यावर प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.सदर रस्ते सुरक्षा समितीच्या वतीने टप्प्याटप्याने कार्यवाही केली जाणार आहे.यावेळी तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, उपाध्यक्ष संतोष दिंडे, सुशिल भांदिगरे, दिपक देसाई, उदय भोसले, मा नगरसेवक धनंजय सावंत, दिलीप ठाणेकर, इब्राहिम मुल्ला, सुनिल शिंदे,धीरज मुळे, विजय पाटील, अप्पा शिगटे, किसन पाटील, धीरज रुकडे,राजू हंडे, संजय वरेकर, अनिल पाटील,राजू माने, रवींद्र सावत, दिलीप दळवी,शशिकांत दिंडे,राहुल घाटगे, प्रकाश दिंडे, अजित मंडलिक, अक्षय दिंडे, किरण आडगुले, रवी दळवी,सुजित जासूद, राऊ पाटणकर, बिपीन घोरपडे, अर्जुन आंबी, गणेश जाधव, हरीश राणे,जयसिंग पाटील, राजू केसरकर,सुभाष घाटगे, कपिल सूर्यवंशी,श्रीकांत बंगडे, धनाजी शिंदे, निलेश पवळ,आदी भागातील नागरिक उपस्थित होते
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
