Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : महाराष्ट्रात सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपण मोहिम व इतर हरित पायाभूत सुविधा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र आयोग’ स्थापन करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 1 लाख 92 हजार वृक्ष लागवड झाली आहे. अनेक यंत्रणांचा या मोहिमेत प्रतिसाद दिसून येत नाही. याची दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व यंत्रणांनी त्यांना दिलेली उद्दिष्टपूर्ती या पावसाळ्यात करावी, असे निर्देश दिले. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2026 च्या पावसाळ्यात 5 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांना…
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): बाबुराव लक्ष्मण दिंडे व प्रतिक बाबुराव दिंडे, रा.उजळाईवाडी, ता. करवीर यांच्याकडून एकूण रक्कम 7 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम वसुल करण्याकरिता टाटा हिताची EX 110 क्रमांक 07230586 पोकलँड जप्त करण्यात आले आहे. विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण रक्कम रू. 7 लाख 50 भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिल कार्यालय करवीर येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाने विकली जाईल. ही विक्री उक्त कसुरदारांचे उक्त संपत्तीवरील अधिकार, हक्क आणि हित संबंध यांच्या पुरतीच मर्यादित आहे. लिलावाच्या शर्ती पुढीलप्रमाणे- टाटा हिताची EX ११० क्रमांक ०७२३०५८६ पोकलँड मालमत्तेचे मुल्यांकन…
कोल्हापूर, दि. २ (जिमाका): कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात पॉश अॅक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कायद्यानुसार १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या शासकीय व खाजगी कार्यालये, संस्था आणि आस्थापनांमध्ये महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती (ICC) गठीत करणे बंधनकारक आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्ह्यातील कार्यालये व संस्थांची विशेष मोहिमेंतर्गत अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत न केलेल्या २३ कार्यालये व संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, तत्काळ अंतर्गत तक्रार समिती…
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, मर्या गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्याकडून एकूण रक्कम 6 लाख 81 हजार 22 रुपये व 10 लाख 15 हजार रुपये अशी एकूण 16 लाख 96 हजार 22 रुपये इतकी रक्कम वसुल करण्याकरिता साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, मर्या. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या मालकीची सि.स.नं 1109/ब, ई- वॉर्ड कोल्हापूर पैकी कसुरदार यांच्या हिस्सेपुरती मिळकत पत्रिकेमध्ये नमूद असलेप्रमाणे स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 16 लाख 96 हजार 22 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर येथे 11 सप्टेंबर रोजी सकाळी…
कोल्हापूर 31 (जिमाका): मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत राधानगरी 33/11 के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त 5 मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्र स्थापित करुन कार्यान्वित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसा अखंडित वीज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेंतर्गत राधानगरी 33/11 के.व्ही. उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या अतिरिक्त 5 मेगावॅट क्षमतेच्या नवीन रोहीत्रचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राधानगरी पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, गट विकास अधिकारी डॉ. संदिप…
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येते. मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असून, त्याचा थेट प्रकाश डोळ्यांवर पडल्याने डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबुळाला इजा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने भाविकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच अन्य कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईटचा वापर प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक…
कोल्हापूर, दि. 31 (जिमाका) : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या मिरवणुका तसेच इतर कार्यक्रमांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters गॅसचा वापर करण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. या काळात विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. काही मंडळांकडून मिरवणुकांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या वापरामुळे मिरवणूक पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः मानवी…
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी 25 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्याने त्यासाठी प्रस्ताव सादर करू नयेत. असमान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर खरेदी 4 लाख रु.व इमारत बांधकाम 10 ते 15 लाख…
एक लाख घरांवर 2 ऑक्टोबर पर्यंत सौर प्रकल्प बसविण्यासाठी योजना गतिमान करा-जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
कोल्हापूर दि. 24 (जिमाका): छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना व स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) सोलर योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात दोन ऑक्टोबर पर्यंत एक लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना गतिमान करून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. रूफ टॉप सोलर प्रकल्प समन्वय व अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस, एम.एस. मिसाळ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री…
कोल्हापूर दिनांक 23 – करवीर पोलीस ठाणे अधिकारी आणि अंमलदार यांचा आज रोजी झालेल्या गुन्हे परिषदेत अलीकडेच कोल्हापूरमध्ये घडलेल्या गर्भलिंग निदानच्या गुन्ह्यात केलेल्या कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.यावेळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कळमकर व ठाणे अंमलदार उपस्थित होते.