
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): बाबुराव लक्ष्मण दिंडे व प्रतिक बाबुराव दिंडे, रा.उजळाईवाडी, ता. करवीर यांच्याकडून एकूण रक्कम 7 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम वसुल करण्याकरिता टाटा हिताची EX 110 क्रमांक 07230586 पोकलँड जप्त करण्यात आले आहे. विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण रक्कम रू. 7 लाख 50 भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिल कार्यालय करवीर येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाने विकली जाईल. ही विक्री उक्त कसुरदारांचे उक्त संपत्तीवरील अधिकार, हक्क आणि हित संबंध यांच्या पुरतीच मर्यादित आहे.
लिलावाच्या शर्ती पुढीलप्रमाणे- टाटा हिताची EX ११० क्रमांक ०७२३०५८६ पोकलँड मालमत्तेचे मुल्यांकन किंमत 10 लाख रु. इतके असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने १/४ रक्कम तात्काळ भरावयाची आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारक यांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित ३/४ रक्कम जमा करावयाची आहे. वरील अटींची पूर्तता न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या ¼ रक्कमेतून वजा केली जाईल. थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर 30 दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारल्याचा खर्च इत्यादी खर्च जमा करून लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकार-याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याचे नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे. त्यास बोली रक्कमेच्या 5 टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल, अशी माहिती तहसिल कार्यालय करवीर यांच्यामार्फत देण्यात आली.
0000