
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, मर्या गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्याकडून एकूण रक्कम 6 लाख 81 हजार 22 रुपये व 10 लाख 15 हजार रुपये अशी एकूण 16 लाख 96 हजार 22 रुपये इतकी रक्कम वसुल करण्याकरिता साने गुरुजी शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था, मर्या. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांच्या मालकीची सि.स.नं 1109/ब, ई- वॉर्ड कोल्हापूर पैकी कसुरदार यांच्या हिस्सेपुरती मिळकत पत्रिकेमध्ये नमूद असलेप्रमाणे स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 16 लाख 96 हजार 22 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर येथे 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाने विकली जाईल. ही विक्री उक्त कसुरदारांचे उक्त संपत्तीवरील अधिकार, हक्क आणि हित संबंध यांच्या पुरतीच मर्यादित आहे.
लिलावाच्या शर्ती खालीलप्रमाणे- वरील तक्त्यात नमूद केलेल्या मालमत्तेचे मुल्यांकन किंमत 47 लाख 61 हजार 730 रुपये या मालमत्तेचे मुल्यांकन इतके असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने 1/4 रक्कम तात्काळ भरावयाची आहे. लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलावधारकाला समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित 3/4 रक्कम जमा करावयाची आहे. वरील अटींची पूर्तता न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या 1/4 रकमेतून वजा केली जाईल. थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर 30 दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारल्याचा खर्च इत्यादी खर्च जमा करून लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकार-याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याचे नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे. त्यास बोली रक्कमेच्या 5 टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल, अशी माहिती तहसिल कार्यालय करवीर यांच्यामार्फत देण्यात आली.
0000