Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दि : 26 (जिमाका): महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान २०२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १५९ प्रलंबित महसुली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. या अभियानाचा ९०० नागरिकांना थेट लाभ झाला. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग आणि तालुका स्तरावर या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल विभागाकडील प्रलंबित प्रकरणे जलदगतीने आणि परस्पर सामंजस्याने सोडविणे हा या अभियानाचा उद्देश होता. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर जिल्हाधिकारी अजय पवार यांच्या प्रयत्नांतून या लोक अदालतीच्या माध्यमातून ९०० नागरिकांना थेट लाभ मिळाला. लोक अदालतीमुळे पक्षकारांना प्रलंबित प्रकरणांमुळे होणारा मानसिक…
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत हेल्मेटचा वापर न केल्यामुळे १६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही बाब लक्षात घेता, दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी यांनी केले आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दुचाकी अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत आणि जीवितहानी टाळण्यासाठी योग्य दर्जाचे हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या व्यक्तीनेही निर्धारित मानकांचे हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. शाळा-महाविद्यालयांनी सूचना फलक आणि डिजिटल माध्यमांद्वारे हेल्मेट वापर व वाहतूक नियमांबाबत संदेश प्रसारित करावेत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि…
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका) : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत केंद्र शासनामार्फत इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास (EBC) तसेच विमुक्त, भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी PM-YASASVI Pre Matric Scholarship आणि PM-YASASVI Post Matric Scholarship या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. या योजनांचे अर्ज केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरून (NSP) स्वीकारण्यात येणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनीता नेर्लीकर यांनी केले आहे. PM-YASASVI Pre Matric Scholarship योजनेंतर्गत इयत्ता नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न…
कोल्हापूर, दि.२२ (जिमाका) : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) औषध भांडारात औषधांचा साठा नसल्याचा दावा करणारा सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या रिकाम्या खोल्या या औषध भांडाराच्या नसून, रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रिकाम्या करण्यात आलेल्या खोल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना नियोजनानुसार औषधांचा पुरवठा सुरू असून, अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी औषधे व साधनसामग्री खरेदी करण्याच्या ६ कोटी १९ लाख ७५ हजार १ रुपयांच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यतेनंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढील खरेदी…
कोल्हापूर, दि.२२ (जिमाका) : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) औषध भांडारात औषधांचा साठा नसल्याचा दावा करणारा सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेल्या रिकाम्या खोल्या या औषध भांडाराच्या नसून, रुग्णालयातील नूतनीकरणाच्या कामामुळे रिकाम्या करण्यात आलेल्या खोल्या आहेत. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना नियोजनानुसार औषधांचा पुरवठा सुरू असून, अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. सन २०२६-२७ या वर्षासाठी औषधे व साधनसामग्री खरेदी करण्याच्या ६ कोटी १९ लाख ७५ हजार १ रुपयांच्या प्रस्तावाला तांत्रिक मान्यतेनंतर २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढील खरेदी…
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्यामार्फत डीहायड्रेशन (निर्जलीकरण) तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन २२ ऑक्टोबरपासून करण्यात आले आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वनिता पाटील यांनी केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात निर्जलीकरण प्रक्रियेतील व्यावसायिक संधी, आवश्यक यंत्रसामग्री आणि निर्जलीकरणाची शास्त्रोक्त पद्धत याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच पालक, मेथी, आले, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कडीपत्ता, पुदिना, गाजर, बीट व केळी यांच्या पावडरी तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात येईल. याशिवाय चिकू, अननस आदी फळांपासून प्रक्रिया उत्पादने तयार करण्याची माहितीही देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान शासकीय अनुदान…
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल अद्ययावत करून ‘महाडीबीटी २.०’ या नवीन स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपचे अर्ज नोंदणी करताना अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नव्या प्रणालीवर आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. सन २०१८-१९ पासून महाडीबीटी ऑनलाइन प्रणालीद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे कामकाज सुरू आहे. आता नवीन महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाच्या आधारे नवीन महाआयडी तयार करणे बंधनकारक आहे. आधार पोर्टलवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि…
कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती राधानगरी यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना स्वयं-सहायता समूहांशी जोडणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि रोजगार व उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमांचा उद्देश होता. नवीन स्वयं-सहायता समूहांच्या स्थापनेसाठी ऐनी व ठीकपुर्ली येथे वर्धिनी फेरी, तर तुरंबे, आवळी बुद्रुक, शिरगाव, नरतवडे, कासारपुतळे, तारळे खुर्द, पंडेवाडी व अटेगाव आदी गावांमध्ये ग्रामसखी फेरीचे आयोजन करण्यात आले. सुळंबी येथे आयोजित आरोग्य शिबिरात समूहातील ५६ महिलांनी सहभाग घेतला. तसेच तालुक्यातील…
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत गडहिंग्लज तालुक्यात आरोग्य विभागामार्फत ८९ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात १६६ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण ७ हजार २१ नागरिकांना विविध आरोग्यविषयक सेवा देण्यात आल्या. या अभियानांतर्गत पाच रक्तदान शिबिरांमध्ये १९७ जणांनी सहभाग घेतला. तसेच २१८ आभा कार्ड, ७५ गोल्डन कार्ड आणि १२५ वयोवंदना कार्ड तयार करण्यात आले. याशिवाय ३६८ जणांची रक्त तपासणी, ५५ जणांची नेत्र तपासणी आणि ५ हजार ३०४ जणांची असंसर्गजन्य आजारांची (एनसीडी) तपासणी करण्यात आली. १४० ईसीजी आणि १५२ एक्स-रे तपासण्याही करण्यात आल्या. तसेच १३ नागरिकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी आयोजित विशेष शिबिरात…
कोल्हापूर, दि.१७ (जिमाका) : महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत आजरा तहसील कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यासह विविध विभागांच्या योजनांची माहिती व आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. या उपक्रमात महसूल, आरोग्य, सेतू, पंचायत समिती, महावितरण, पशुसंवर्धन आणि नगरपंचायत आदी विभागांनी सहभाग घेतला. तहसीलदार समीर माने यांनी उपस्थित नागरिकांना सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली. महसूल विभागामार्फत ३५ लाभार्थ्यांना सातबारा उतारे, ४२ लाभार्थ्यांना नॉन क्रिमिलेअर दाखले, २८ लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, ६ लाभार्थ्यांना जातीचे दाखले, तर २३ लाभार्थ्यांना ई-रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. विविध विभागांच्या सहभागातून नागरिकांना…