Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात PM National Apprenticeship Mela (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती (Apprenticeship) मेळावा सोमवार, 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता AVTS Hall, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड येथे आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. तरी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. आवटे यांनी केले. 0000
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): चिकोत्रा प्रकल्पाच्या चिकोत्रा नदी भागामध्ये पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांनी पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे. चिकोत्रा नदी को.प. बंधारा 1 ते को.प. बंधारा बेळुंखी (29) वर 21 ते 29 मार्चपर्यंत, 18 ते 26 एप्रिलपर्यंत, 16 ते 24 मे याप्रमाणे उपसाबंदी करण्यात आली आहे. उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असे पाटबंधारे विभागामार्फत कळविण्यात आले आहे. 000
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, 13 मार्च रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता कागल विधानसभा मतदार संघातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वर्ग 4 कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती नियुक्ती पत्र वाटप. (स्थळ: शेंडा पार्क) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल) शनिवार,…
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 16 मार्च रोजी स. 10.00 ते दु. 2.00 या वेळेत “अप्रेंटिसशिप प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे 16 मार्च रोजी होणाऱ्या या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये इलेक्ट्रीशियन, वेल्डर, फिटर, आणि पंप मॅकेनिक पदांकरीता 340 पेक्षा जास्त रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP ) प्रशिक्षीत उमेदवार तसेच 10…
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती एलपीजी गॅसचा सुरळीत, पारदर्शक व नियंत्रित पुरवठा होण्यासाठी व कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरक/गॅस एजन्सी धारकांना पुढील सूचना देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व एलपीजी वितरकांनी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त होम डिलिव्हरी पद्धतीनेच करावा. ग्राहकांना गोडाऊन अथवा एजन्सीवरून थेट सिलेंडर वितरण करू नये. तसेच सिंगल गॅस सिलिंडर कनेक्शन धारकांना प्राधान्य देण्यात यावे. गॅस सिलेंडरचे वितरण हे ऑनलाईन बुकींग झालेल्या ग्राहकांनाच करण्यात यावे तसेच नोंदणीकृत ग्राहकांनाच नियमानुसार पुरवठा करण्यात यावा, अनधिकृत ग्राहकांना किंवा नियमबाह्य पद्धतीने सिलेंडर वितरण करू नये. कोणत्याही ग्राहकास अनावश्यक साठा…
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया अधिक कार्यक्षम व जलद करण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित केले. या प्रशिक्षण सत्रामध्ये पासपोर्ट पडताळणीची प्रक्रिया, अलीकडील तांत्रिक सुधारणा आणि अचूक व वेळेत पोलीस पडताळणी अहवाल सादर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पासपोर्ट प्राधिकरण आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट सेवा अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच वेळेत आणि अचूक पोलीस पडताळणी ही पासपोर्ट वितरण प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून ती राष्ट्रीय…
कोल्हापूर दि. ११ नवी दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरला जोडणार्या विविध महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने भरीव निधी दिल्याबद्दल आभार मानले. तसेच कोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, अशी मागणी केली. त्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत सकारात्मक प्रतिसाद देवून, या प्रकल्पांबद्दल सविस्तर माहिती दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या अनेक मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कागल ते सातारा सहा लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी २ हजार १६२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर कोल्हापूर ते रत्नागिरी चार लेन कॉंक्रीट रस्त्यासाठी ५ हजार १९२…
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : वस्तू व सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत सर्व करदात्यांनी विहित मुदतीत जीएसटी विवरणपत्रे (GST Returns) सादर करणे व देय असलेली कर रक्कम वेळेत भरणे हे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. तथापि विभागाच्या निदर्शनास आले आहे की काही नोंदणीकृत करदात्यांनी अद्याप जीएसटी विवरणपत्रे सादर केलेली नाहीत तसेच काही करदात्यांकडे कर थकबाकी प्रलंबित आहे. यामुळे कर पालन प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर, वस्तू व सेवा कर विभागामार्फत प्रलंबित विवरणपत्रे सादर करून घेणे व कर थकबाकी भरण्यासाठी विशेष पाठपुरावा मोहीम (Special Drive) हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत रिटर्न न भरणाऱ्या व कर थकबाकीदार करदात्यांशी संपर्क साधण्यात…
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : होलार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादितची उप कंपनी) च्या फलकाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी संत रोहिदास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम.पवार, समाज कल्याणचे अधिकारी अक्षय कुरणे व महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत,सतीश कांबळे, शितल भोरे,विश्वास करंबे व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते. 0000
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 13 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि पंप मॅकेनिक पदांकरीता 140 पेक्षा जास्त रिक्तपदे आहेत. यासाठी अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम ( STEP ) प्रशिक्षीत उमेदवार, 10 वी, 12 वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम…