
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यात PM National Apprenticeship Mela (PMNAM) अंतर्गत शिकाऊ उमेदवारी भरती (Apprenticeship) मेळावा सोमवार, 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता AVTS Hall, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड येथे आयोजित केलेला आहे.
या मेळाव्यास जिल्ह्यातील नामांकीत आस्थापना सहभागी होणार आहेत. तरी आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र घेवून मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार श्री. आवटे यांनी केले.
0000