
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : होलार समाज आर्थिक विकास महामंडळ मर्यादित (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादितची उप कंपनी) च्या फलकाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी संत रोहिदास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम.पवार, समाज कल्याणचे अधिकारी अक्षय कुरणे व महात्मा फुले महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत,सतीश कांबळे, शितल भोरे,विश्वास करंबे व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.
0000