
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम (STEP) योजनेअंतर्गत प्रशिक्षित उमेदवारांना तसेच इतर नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व सरसेनापती प्रतापराव गुजर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, 13 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि पंप मॅकेनिक पदांकरीता 140 पेक्षा जास्त रिक्तपदे आहेत. यासाठी अल्पमुदतीचा रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम ( STEP ) प्रशिक्षीत उमेदवार, 10 वी, 12 वी, आयटीआय पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युम सोबत आणणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले.
00000