
कोल्हापूर दि. 12 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, 13 मार्च रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता कागल विधानसभा मतदार संघातील विविध विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय) दुपारी 1 ते 4 वाजता राखीव. दुपारी 4 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वर्ग 4 कर्मचाऱ्यांची सरळसेवा भरती नियुक्ती पत्र वाटप. (स्थळ: शेंडा पार्क) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)
शनिवार, 14 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व कागल तहसिल कार्यालय यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानस उपस्थिती. दुपारी 1 ते 6 राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)
रविवार, 15 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 10 वाजता गोरंबे, ता. कागल येथील श्री भावेश्वरी मंदिर वास्तुशांती व कलशारोहण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ: गोरंबे, ता. कागल) सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (गोकुळ) यांच्या उत्पादन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: गोकुळ दूध संघ, शिरगांव) दुपारी 3.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दीक्षांत समारंभास उपस्थिती. (स्थळ: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) (स्थळ: निवासस्थान कागल) सायं. 6.45 वाजता आ. राहुल आवाडे, रा. इचलकरंजी यांची कन्येच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ: कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना) सायं. 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कागल नगरपरिषद, कागल आयोजित पाझर तलाव येथील रेनडान्स फौंटन व कृत्रिम कासव धबधब्याचा लोकार्पण सोहळा व लेक व्ह्यु रिसॉर्टच्या भूमिपुजन समारंभास उपिस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल)
सोमवार, 16 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) राखीव. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
0000