Author: admin

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) निकाल शनिवार, 2 मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. निकालानंतर राज्य मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत असून या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे – ९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६ हे समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक…

Read More

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, कोल्हापूर कार्यालयामार्फत मे 2026 ते मार्च 2027 पर्यंत एनसीसी भवन, शिवाजी विद्यापीठ आवार येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रतिदिन न्याहरी व जेवण पुरवठा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रती दिन खर्चाचे दरपत्रक 8 मे पर्यंत समादेशक अधिकारी 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे पाठवावीत. अधिक माहितीसाठी 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2694573 वर संपर्क साधावा, असे आवाहन 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवनचे कमांडींग ऑफिसर यांनी केले आहे.…

Read More

कोल्हापूर, दि.०१ : महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज स्वराज्य भवन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साही वातावरणात ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी प्रथम सामूहिक वंदे मातरम गायले. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताच्या सुरांनी आसमंत दुमदुमून गेला होता आणि उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. या सोहळ्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, प्रांताधिकारी मोसमी चौगुले यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस…

Read More

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी 14 जुलै 2022 रोजी जिल्ह्यात मंजुरी दिलेल्या रुग्ण्वाहिकांसाठीचे दर पुढीलप्रामणे आहेत. रुग्णवाहिका (इंधनसहित भाडे)- मारुती व्हॅन- 20 किमी अथवा 2 तासांसाठी 450 रु., प्रति किमी भाडे रु. इंधन सहित 12 रु., प्रति दिन (24 तासांकरीता) भाडे रु. (धाव मर्यादा 100 किमी) 3000, मासिक भाडे रु. 90 हजार रु. टाटा सुमो व मेटॅडोर सदृष्य कंपनीने बांधणी केलेली वाहने- 20 किमी अथवा 2 तासांसाठी 600 रु., प्रति किमी भाडे रु. इंधन सहित 14 रु., प्रति दिन (24 तासांकरीता) भाडे रु. (धाव मर्यादा 100 किमी) 3500, मासिक भाडे रु. 1 लाख, 5 हजार रु.…

Read More

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): प्र.जि.मा. 78 वरील कळे बाजारपेठ (दस्तुरी चौक ते देसाई गल्ली फाटा) या मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे हा रस्ता 28 एप्रिल ते 31 मे या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड व हलक्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 अन्वये जारी केले आहेत. कळे गावातील बाजारपेठ भागात काँक्रीट रस्ता व आर.सी. गटर्सचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. काँक्रीट रस्त्यासाठी आवश्यक कॅम्बर राखणे, तसेच डी.एल.सी.सी. व इतर थरांचे काम करताना अडथळे येत आहेत. याशिवाय…

Read More

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्हा 100 टक्के साक्षर करण्याच्या उद्दिष्टाला मोठी चालना मिळणार आहे. उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. ***

Read More

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार अनुदान व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले 31 मे पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (नि.) यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. सर्व लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ***

Read More

कोल्हापूर, दि. २८* : प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने केले. नागरिकांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणे हे प्रत्येक शासकीय घटकाचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद करीत जास्तीत जास्त सेवा कमीत कमी कागदपत्रात आणि अधिक पारदर्शकपणे लोकांना द्या, असे आवाहनही केले. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात ‘सेवा हक्क दिन’ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी लोकसेवेचे महत्त्व पटवून दिले. सेवा वितरणात उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सन्मानही…

Read More

प्रतिवर्षी २५ एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक हिवताप (मलेरिया) दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा मुख्य हेतू मलेरियासारख्या गंभीर आजाराबद्दल जनमानसात जागृती निर्माण करणे, रोगाचा प्रसार रोखणे आणि वेळेत निदान व उपचारांचे महत्त्व पटवून देणे हा आहे. विशेषतः वाढते प्रदूषण आणि जागतिक हवामान बदलामुळे कीटकजन्य व जलजन्य आजारांचे संकट भविष्यात अधिक गडद होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. मलेरिया हा केवळ ताप नसून तो कधीकधी जीवघेणा ठरू शकतो; विशेषतः भारतासारख्या उष्णकटिबंधीय विकसनशील देशांमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक आढळतो. चालू वर्षाच्या आकडेवारीनुसार, कोल्हापूर परिमंडळातील कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत…

Read More

कोल्हापूर, दि. २४ (जिमाका) : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान (निक्षय मित्र) अंतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याच्या उद्देशाने कोल्हापुरात राबविण्यात येत असलेल्या “निक्षय गीत मैफिल” या नाविन्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाने ३०० मैफिलींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्याने जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. जागतिक संगीत दिन (२१ जून २०२५) निमित्त सुरू झालेल्या या उपक्रमाचा कालावधी २० जून २०२६ पर्यंत असून, सलग ३०० दिवसांत ३०० मैफिली आयोजित करून एक वेगळाच आदर्श निर्माण करण्यात आला आहे.…

Read More