
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): प्र.जि.मा. 78 वरील कळे बाजारपेठ (दस्तुरी चौक ते देसाई गल्ली फाटा) या मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे हा रस्ता 28 एप्रिल ते 31 मे या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड व हलक्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मोटार वाहन कायदा कलम 115 व 116 अन्वये जारी केले आहेत.
कळे गावातील बाजारपेठ भागात काँक्रीट रस्ता व आर.सी. गटर्सचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने कामात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. काँक्रीट रस्त्यासाठी आवश्यक कॅम्बर राखणे, तसेच डी.एल.सी.सी. व इतर थरांचे काम करताना अडथळे येत आहेत. याशिवाय काँक्रीटच्या दोन्ही थरांना किमान 28 दिवस ‘क्युरिंग’ आवश्यक असल्याने या कालावधीत कोणतीही वाहतूक करणे शक्य नसते. बाजारपेठेतील गर्दी, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे व विद्युत तारा यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्था :- गनबावडाकडून बाजारभोगांव अणुस्कूरा घाटाकडेकडे जाणाऱ्या हलक्या 4 चाकी वाहनांकरीता राष्ट्रीय महामार्ग 166 जी पासून हरिजन वस्ती कमान ते मराठी शाळा चौक दुहेरी वाहतूक व शाळा चौक ते पुनाळ फाटा एकेरी वाहतूक व तिथून पुढे प्र.जि.मा. 78 वरून तळेवाडी. अणुस्कुराकडून गगनबावडाकडे जाणा-या हलक्या 4 चाकी वाहनाकरीता कळे एस.टी. स्टॅंड ते मराठी शाळा चौक एकेरी वाहतूक व तिथून पुढे राष्ट्रीय महामार्ग 166 जी या दैनंदिन मार्गाने गगनबावड्याकडे.
कोल्हापूर आणि गगनबावडाकडून येणाऱ्या अवजड वाहनांकरिता राष्ट्रीय महामार्ग 166 जी वरून प्र.जि.मा. 18 वरून कोपार्डे फाटा पासून पडळ फाटा ते रा.मा. 193 वरून पुनाळ फाटा, काटेभोगाव फाटा तिथून पुढे दैनंदिन मार्गाने बाजारभोगाव मार्ग अणुस्कुरा. अणुस्कुरा मार्गे येणाऱ्या वाहनांकरिता रा.मा. 193 वरून काटेभोगाव फाटा पासून पडळ फाटा ते कोपर्डे फाटा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 166 जी तिथून पुढे दैनंदिन मार्गाने कोल्हापूर किंवा गगनबावडा.
वाहनचालकांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
*******