
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र गौरव पुरस्कार अनुदान व सुवर्ण महोत्सवी अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपले हयातीचे दाखले 31 मे पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (नि.) यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर येथे हयातीचे दाखले प्राप्त झालेल्या लाभार्थींची अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात येते. सर्व लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा झाल्याची खात्री करण्यासाठी 0231-2665812 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
***