
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) निकाल शनिवार, 2 मे रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. निकालानंतर राज्य मंडळ स्तरावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत असून या समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे –
९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६
हे समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून आठ दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले.
00000