
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, कोल्हापूर कार्यालयामार्फत मे 2026 ते मार्च 2027 पर्यंत एनसीसी भवन, शिवाजी विद्यापीठ आवार येथे वेगवेगळी वार्षिक प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रतिदिन न्याहरी व जेवण पुरवठा करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रती दिन खर्चाचे दरपत्रक 8 मे पर्यंत समादेशक अधिकारी 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे पाठवावीत.
अधिक माहितीसाठी 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवन, पहिला मजला, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक 0231-2694573 वर संपर्क साधावा, असे आवाहन 5 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक, एनसीसी भवनचे कमांडींग ऑफिसर यांनी केले आहे.
0000