
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या व्यापक प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, येत्या 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ‘असाक्षर मुक्त गाव’ शपथ घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूर जिल्हा 100 टक्के साक्षर करण्याच्या उद्दिष्टाला मोठी चालना मिळणार आहे.
उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे.
***