Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर आणि आजरा महाविद्यालय, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने 23 जून रोजी सकाळी 10 ते दु. 2 या वेळेत आजरा महाविद्यालय येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 7 खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून 129 रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 8 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला…
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे प्रतिवर्षी 26 रोजी ‘राजर्षी शाहू जयंती’ साजरी केली जाते. त्यानुसार 21 ते 25 जूनपर्यत राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जून रोजी सायं. 6 वाजता सन 2026 चा जेष्ठ इतिहास संशोधक स्व.डॉ. जयसिंगराव पवार यांना (मरणोत्तर) ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यतेखाली प्रदान करण्यात येणार आहे. सर्व करवीरवासियांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजय राठोड यांनी केले . 0000
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शनिवार, 20 जून रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता श्री महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व श्री महालक्ष्मी मंदिराच्या जतन व संवर्धन कामाच्या शुभारंभाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता विमानाने…
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, दुपारी 12.30 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क मैदान, इचलकरंजी येथे आगमन व सभेच्या ठिकाणाची पाहणी. सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन व सभेच्या ठिकाणाची पाहणी. सायं. 5 वाजता महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व पाहणी. सायं. 6 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथे आगनम व राखीव. रात्री 8 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे आगमन प्रित्यर्थ स्वागतास उपस्थित.…
योजनेचे नाव: सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्या कौशल्य विकास विभागामार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील युवक-युवती आणि महिलांच्या रोजगारक्षमता, उद्योजकता व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध कौशल्य विकास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम हा मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील युवक-युवतींमध्ये उद्योजकता विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. या योजनेअंतर्गत नवउद्योजकांना व्यवसाय संकल्पना विकसित करण्यापासून ते उद्योग उभारणीपर्यंत आवश्यक मार्गदर्शन, तांत्रिक सहाय्य, कौशल्य प्रशिक्षण, उद्योग व्यवस्थापन, वित्तीय नियोजन, विपणन तंत्रे तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांना आणि…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार, 19 जून रोजी रात्री 9 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या स्वागतास उपस्थिती. रात्री 9.20 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. शनिवार, 20 जून रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार इचलकरंजी येथून केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना निरोप देण्यासाठी कोल्हापूर…
मुंबई, दि. 18 : इचलकरंजी शहर आणि परिसराच्या दीर्घकालीन; तसेच शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. पाणी साठवणीची क्षमता वाढविण्यासह विविध पर्यायांचा अभ्यास करून लवकरच यासंदर्भातील निर्णय जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, इचलकरंजीचे महापौर, उपमहापौर; तसेच जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत इचलकरंजी शहराच्या वाढत्या पाणी गरजा, कृष्णा नदीवरील उपलब्ध जलस्रोत; तसेच तालुक्यातील गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार राहुल आवाडे यांनी सादरीकरण केले. …
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, 18 जून रोजी सायं. 6.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सायं. 6.45 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या आयोजित दौऱ्याकरिता पूर्वतयारी नियोजन बैठकीस उपस्थिती. (स्थळ: पोलीस परेड ग्राऊंड) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शुक्रवार, 19 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. विविध कार्यक्रमांसाठी राखीव. रात्री 9 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळ येथे उपस्थिती. रात्री 9.20 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्य समवेत शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : पोस्टल पेन्शनधारकांच्या तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजी यांच्यावतीने सोमवार, 20 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीचा लाभ गोवा राज्यासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारींचा या अदालतीत विचार करण्यात येणार आहे. टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे तीन महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्रवेशसत्र ऑगस्ट 2026 साठी विविध अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांमध्ये एकूण 1 हजार 316 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेत दोन वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व्यवसायांसाठी 772 जागा उपलब्ध असून त्यामध्ये आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, इन्फमेश कम्युनिकेशन टेक्नॉ. सिस्टीम मेन्टनन्स, यंत्रकारागीर, यंत्रकारागीर घर्षक, मेक मशिन टूल्स मेन्टनन्स, कातारी, वीजतंत्री, जोडारी, यांत्रिकी प्रशितन व वातानुकुलीत टेक्नीशियन, रंगारी सर्वसाधारण, टूल ॲन्ड डायमेकर, तारतंत्री, यांत्रिकी मोटारगाडी, यांत्रिकी कृषी व यंत्रसामुग्री, वीज विलेपक इ. तसेच एक वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांसाठी 544 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये यांत्रिकी…