
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्रवेशसत्र ऑगस्ट 2026 साठी विविध अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांमध्ये एकूण 1 हजार 316 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
संस्थेत दोन वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व्यवसायांसाठी 772 जागा उपलब्ध असून त्यामध्ये आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, इन्फमेश कम्युनिकेशन टेक्नॉ. सिस्टीम मेन्टनन्स, यंत्रकारागीर, यंत्रकारागीर घर्षक, मेक मशिन टूल्स मेन्टनन्स, कातारी, वीजतंत्री, जोडारी, यांत्रिकी प्रशितन व वातानुकुलीत टेक्नीशियन, रंगारी सर्वसाधारण, टूल ॲन्ड डायमेकर, तारतंत्री, यांत्रिकी मोटारगाडी, यांत्रिकी कृषी व यंत्रसामुग्री, वीज विलेपक इ.
तसेच एक वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांसाठी 544 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये
यांत्रिकी कृषित्र, नळ कारागीर, बांधकाम कारागीर, वूड वर्क टेक्नीशियन, संधाता, पत्रेकारागीर, यांत्रिकी डिझेल, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर व बिगर अभियांत्रिकी व्यवसायासाठी सुईंग टेक्नॉलॉजी, सरफेस ऑरनॉमेंटेशन टेक्नीक्स, बेसिक कॉस्मॉटोलॉजी, फ्रूट ॲन्ड व्हिजीटेबल, लघूलेखन (इंग्रजी) व कॉम्प्युटर ऑपरेटर ॲन्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट इ.
यातील काही व्यवसायांसाठी 10 वी उत्तीर्ण तसेच काही व्यवसायांसाठी 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सरकारी, निमसरकारी, खासगी आस्थापना, महानगरपालिका, साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, सैन्यदल, गारमेंट उद्योग, डाटा ऑपरेटिंग क्षेत्र तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
0000