
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दिमता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शनिवार, 20 जून रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता श्री महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण. सकाळी 10.45 वाजता श्री महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व श्री महालक्ष्मी मंदिराच्या जतन व संवर्धन कामाच्या शुभारंभाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12.45 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000