
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, 18 जून रोजी सायं. 6.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सायं. 6.45 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या आयोजित दौऱ्याकरिता पूर्वतयारी नियोजन बैठकीस उपस्थिती. (स्थळ: पोलीस परेड ग्राऊंड) सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शुक्रवार, 19 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. विविध कार्यक्रमांसाठी राखीव. रात्री 9 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी कोल्हापूर विमानतळ येथे उपस्थिती. रात्री 9.20 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्य समवेत शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, 20 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व आगमन. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून सोयीनुसार इचलकरंजी येथून केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना निरोप देण्यासाठी कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. सोयीनुसार कागल निवासस्थान येथे आगमन व मुक्काम.
रविवार, 21 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.40 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
00000