
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार, दुपारी 12.30 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे टेक्सटाईल पार्क मैदान, इचलकरंजी येथे आगमन व सभेच्या ठिकाणाची पाहणी. सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन व सभेच्या ठिकाणाची पाहणी. सायं. 5 वाजता महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व पाहणी. सायं. 6 वाजता संभाजीनगर निवासस्थान येथे आगनम व राखीव. रात्री 8 वाजता कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. रात्री 9.15 वाजता केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे आगमन प्रित्यर्थ स्वागतास उपस्थित. रात्री 9.20 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगनम व राखीव. सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थान येथे आगमन व राखीव.
शनिवार, 20 जून रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वाजता महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. सकाळी 11.35 वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6 वाजता इचलकरंजी येथून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. सायं. 6.35 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सोयीनुसार संभाजीनगर निवासस्थानी आगमन व राखीव. रात्री 11 वाजता संभाजीनगर निवासस्थानाहून रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 11.15 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व पुणे स्पेशल एक्सप्रेसने पुण्याकडे प्रयाण.
0000