
कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र, बालिंगामार्फत सांगरुळ येथे महिलांना रोजगार निर्मितीकरीता जिल्हा नियोजन समिती व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पातून कोल्हापूरी चप्पल युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटचे उद्घाटन शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे व विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती माविमतर्फे देण्यात आली आहे.
या कोल्हापुरी चप्पल प्रकल्पामुळे स्वंयसहाय्यता बचत गटांतील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होण्यास मदत होईल तसेच विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन माविमतर्फे करण्यात आली आहे.
0000