
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार, 19 जून रोजी रात्री 9 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या स्वागतास उपस्थिती. रात्री 9.20 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
शनिवार, 20 जून रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून श्री महालक्ष्मी मंदिराकडे प्रयाण व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार इचलकरंजी येथून केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांना निरोप देण्यासाठी कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण करतील. सायं. 7 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 7.40 वाजता विश्रामगृहाकडून कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री 8 वाजता विमानतळ येथे आगमन व रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000