Author: admin

कोल्हापूर, दि.19 (जिमाका): श्री अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असणारी सर्व कामे दर्जेदार करा. गरुड मंडपाचे काम शक्य तितक्या गतीने करा. गरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. श्रीअंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सुयश पाटील, कॉन्ट्रॅक्टर चंदुलाल ओसवाल, कन्सल्टंट योगेश कासार -पाटील आदी उपस्थित होते. अंबाबाई मंदिराला भेट देऊन गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी पाहणी केली जाईल.…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील एकूण 203 उद्योक घटकांमार्फत 6 हजार 105 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात येणार असून या माध्यमातून 20 हजार 835 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयुक्त (उद्योग) आयुक्तालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार तसेच विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. ही परिष्ज्ञद 21 ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा येथे दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा होत आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर येत असतात. जोतिबा डोंगरावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 (1) (क) अन्वये वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत. जोतिबा डोंगरावरील वाहनांची संख्या, उपलब्ध पार्किंग व्यवस्था तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दानेवाडी फाटा क्रॉसिंग…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल, ता. भुदरगड येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 34 खासगी उद्योजकांकडून 3 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय आजरा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी लेखी स्वरुपात तक्रारी दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘राह-वीर’ (पूर्वीची गुड समेरिटन योजना) योजनेची घोषणा केली आहे. अपघातातील गंभीर जखमींना पहिल्या महत्त्वाच्या तासात (गोल्डन अवर) तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र ‘राह-वीर’ व्यक्तीला 25 हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. एकाच गंभीर अपघातात एकापेक्षा अधिक नागरिकांनी मिळून एखाद्याचा जीव वाचविल्यास 25 हजार रुपयांची रक्कम संबंधित मदतगारांमध्ये समान विभागली जाईल. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा या पारितोषिकाचा लाभ घेता येईल. वर्षभरात…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल, ता. भुदरगड येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 34 खासगी उद्योजकांकडून 3 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा…

Read More

कोल्हापूर, दि.१४ : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावपातळीपासून विविध आरोग्य संस्था तसेच जिल्हास्तरापर्यंत कार्यरत असलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील विविध आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी स्वातंत्र्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचा थेट ऑनलाइन जनसंवाद कार्यक्रम दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथून या ऑनलाइन सभेचे व उद्घाटनचे नियोजन करण्यात आले आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील ग्राम आरोग्य, स्वच्छता व पोषण समिती (VHNSC), जन आरोग्य समिती (JAS), रुग्ण कल्याण समिती (RKS) तसेच एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती यांच्या अशासकीय सदस्यांशी मंत्री महोदय थेट संवाद साधणार आहेत. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची…

Read More

कोल्हापूर 14 (जिमाका) : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नयेत. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा सकाळी 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात मुख्य शासकीय…

Read More