Author: admin

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : मुंबई मुख्यालय तसेच पुणे येथील धर्मादाय कार्यालयाची भोजनाची वेळ दुपारी १.३० ते २ अशी आहे. मुंबई मुख्यालय, पुणे, कोल्हापूर तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाच्या वेळेत तफावत असल्याने, महत्त्वाच्या कामकाजासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करताना अडचणी निर्माण होत होत्या. मुंबई मुख्यालय, पुणे व अधिनस्त कार्यालयांकडून माहिती प्राप्त करून घेणे तसेच कोल्हापूर विभागातील माहिती संबंधित कार्यालयांना पाठविणे यामध्ये व्यत्यय येत होता. शासन परिपत्रकात नमूद केलेली वेळ आणि विभागीय कार्यालयांची भोजनाची वेळ यामध्ये विसंगती दिसून येत होती. त्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी या आदेशान्वये कोल्हापूर कार्यालय तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि…

Read More

कोल्हापूर, दि. 11 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले असून राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे. ही…

Read More

कोल्हापूर, दि. 11 : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, 11 जून रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शुक्रवार, 12 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थान येथे सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 ते 5.30 वाजता राखीव. सायं. 5.30 वाजता गलगले, ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 13 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता गोरंबे, ता. कागल येथील प्राथमिक शाळेच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी…

Read More

कोल्हापूर, दि. 11 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026-27 या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे सुरू झाले आहे. 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण लस उत्पादनाच्या 40 टक्के म्हणजेच 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य क्रमाने लसीकरण…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुका लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवार, 15 जून रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय, कागल येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरुपात दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन तालुका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : भारतीय संस्कृतीत योगाला असलेले महत्त्व यामध्ये, पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या खेळाडूंनी मिळवलेले यश हे अत्यंत कौतुकास्पद आहे. खेळामध्ये कोल्हापूर अग्रगण्य राहील यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या पायाभूत सुविधा व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जागतिक योगासन स्पर्धेमध्ये पदकप्राप्त विजेत्यांच्या सत्कार प्रसंगी केले. 4 ते 8 जून दरम्यान ट्रांस स्टडिया स्टेडीयम, अहमदाबाद (गुजरात) येथे संपन्न झालेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पोर्टस चॅम्पियन स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तीन खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत सीनियर ब गटात सुपाईन या प्रकारात रोहित चव्हाण याने तर ज्युनिअर गटात वृंदा भुतडा हिने फाँरवर्ड बेंडिंग व…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : बदलत्या शैक्षणिक आणि सामाजिक वातावरणात विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया व डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासाचा संस्थेला दीर्घ अनुभव असून प्रशिक्षणाचा…

Read More

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन 2026-27 करिता महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 1 नोव्हेंबर 2003 नुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करु नये, असे निर्देश आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करु नये, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. अन्यथा ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर संदर्भिय शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. 0000

Read More

त्रऋकोल्हापूर, दि. 9 (जिमाका): राज्यामध्ये विविध पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणारी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना सन 2026-27 साठी जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादकतेत वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे, त्यांचा गौरव करणे आणि त्यांच्या अनुभवांचा लाभ इतर शेतकऱ्यांना व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा राबविण्यात येत आहे. यामुळे राज्याच्या एकूण कृषी उत्पादनात मोलाची भर पडण्यास मदत होणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावरील स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मिळालेल्या उत्पादकतेच्या आधारे तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील विजेत्यांची निवड…

Read More

कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. अशासकीय सहा. व्यवस्थापक- एकत्रित मानधन 31 हजार 875 रुपये – जेसीओ पदावरुन सेवानिवृत्त असावा. लिपिक- एकत्रित मानधन 24 हजार 875 रुपये- जेसीओ/ हवलदार पदावरुन सेवानिवृत्त असावा. तसेच मल्टी टास्क सर्व्हिसेस (बहु कार्य सेवा) पदे- वाहन चालक- एक पद, मानधन- 14 हजार 700 रुपये, वीजतंत्री- एक पद, मानधन- 14 हजार 700 रुपये, प्लंबर- एक पद, मानधन- 13 हजार 271 रुपये, माळी- दोन पदे, मानधन- 13 हजार 271 रुपये, सफाई कामगार (पुरुष)- चार पदे, मानधन- 13…

Read More