
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : शैक्षणिक वर्ष सन 2026-27 करिता महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 1 नोव्हेंबर 2003 नुसार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करु नये, असे निर्देश आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करु नये, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी आकारणी करण्यात येऊ नये. अन्यथा ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकडून फी आकारणी केली जाईल अशा महाविद्यालयांवर संदर्भिय शासन निर्णयातील तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
0000