
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे अशासकीय पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.
अशासकीय सहा. व्यवस्थापक- एकत्रित मानधन 31 हजार 875 रुपये – जेसीओ पदावरुन सेवानिवृत्त असावा. लिपिक- एकत्रित मानधन 24 हजार 875 रुपये- जेसीओ/ हवलदार पदावरुन सेवानिवृत्त असावा.
तसेच मल्टी टास्क सर्व्हिसेस (बहु कार्य सेवा) पदे- वाहन चालक- एक पद, मानधन- 14 हजार 700 रुपये, वीजतंत्री- एक पद, मानधन- 14 हजार 700 रुपये, प्लंबर- एक पद, मानधन- 13 हजार 271 रुपये, माळी- दोन पदे, मानधन- 13 हजार 271 रुपये, सफाई कामगार (पुरुष)- चार पदे, मानधन- 13 हजार 271 रुपये, सफाई कामगार (महिला)- दोन पदे, मानधन- 13 हजार 271 रुपये व चौकीदार- सात पदे, मानधन- 14 हजार 106 रुपये इतके राहणार आहे.
ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आपले अर्ज 19 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून विहीत नमुन्यातच अर्ज सादर करावा. एका उमेदवाराने फक्त 1 (एका) पदासाठीच अर्ज करावा. प्राप्त अर्जांची पडताळणी करुन उमेदवारांना मुलाखतीसाठी मोबाईलव्दारे कळविण्यात येईल.
उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे किंवा मोबाईल नंबर ९१७२०३५६१२ व दुरध्वनी क्रमांक ०२३१- २६६५८१२ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.