
कोल्हापूर, दि. 11 : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, 11 जून रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शुक्रवार, 12 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थान येथे सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 ते 5.30 वाजता राखीव. सायं. 5.30 वाजता गलगले, ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
शनिवार, 13 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता गोरंबे, ता. कागल येथील प्राथमिक शाळेच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 5.30 वाजता राखीव. सायं. 5.30 वाजता श्री चंद्रप्रभा विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित, हेरले, ता. हातकणंगले येथील नुतन इमारतीच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
रविवार, 14 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता मुरगूड शहरातील पक्षाच्यावतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभास उपस्थिती. दुपारी 12 ते 5.30 वाजता राखीव. सायं. 5.30 वाजता मांगनूर, ता. कागल येथील विद्यामंदिर शाळेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.
सोमवार, 15 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता ग्रामीण क्षेत्रातील विधानसभा मतदार संघाकरीता एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती बैठकीस उपस्थिती. (स्थळ : कागल)दुपारी 1 ते 6 वाजता राखीव. रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000