Author: admin

कोल्हापूर दिनांक 24-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीने आर टी ई प्रवेश प्रक्रिया चौकशी प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.तसेच कोल्हापूर शहराच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.याबाबत सोमवार पासून कार्यवाही सुरू करू असा शब्द दिला आहे. कोल्हापूर शहरातील खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे.या प्रकरणात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने शाळांमध्ये प्रवेश घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यामुळे संघटनेने सर्व प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत पालकमंत्री…

Read More

कोल्हापूर दि:22 (जिमाका) राज्यातील जनतेला दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू असून , आज या ठिकाणी भरविण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तर माजी उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचेआयोजन करण्यात आले होते याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . व्यासपीठावर महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड ,पोलीस अधीक्षक नीलोत्पल,मुद्रांक जिल्हाधिकारी…

Read More

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली माय भारत (MY Bharat) जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक संपन्न झाली. बैठकीत माय भारत उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींचा विकासात्मक, सामाजिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. युवकांना तंत्रज्ञान, स्वयंसेवा, कौशल्यविकास आणि विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी माय भारत हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह जिल्हा सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या देशव्यापी अभियानाची माहिती देण्यात आली. संगीत, नृत्य, कविता, वादविवाद, चित्रकला, घोषवाक्य लेखन,…

Read More

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची (CSR) प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत…

Read More

कोल्हापूर दि:22 (जिमाका) रक्तदानामुळे रुग्णांचे जीवन वाचण्यास मदत होते.रक्तदान हे अतिशय पुण्याचे काम आहे.आज होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी अभूतपूर्व रक्तदान करावे असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीदिनानिमित्त तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागामार्फत आज रक्तदान , विशेष आरोग्य तपासणी शिबिर तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर जनसेवा सप्ताह अंतर्गत महाआरोग्य सेवा अभियानाप्रित्यर्थ CPR मधील मेट्रन वार्ड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर व आरोग्य जनजागृती रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत…

Read More

इचलकरंजी, दि. २२ : पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि ‘नशामुक्त अभियान’ चा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने इचलकरंजी येथील रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या ७० सायकलपटूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या सहकार्याने इचलकरंजी ते पंढरपूर असा सुमारे १६५ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती आणि सायकलिंगद्वारे आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला. शिवतीर्थ येथून पहाटे ५.३० वाजता सायकल वारीला प्रारंभ झाला. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष पंकज कोठारी, माजी अध्यक्ष प्रकाश रावळ, इचलकरंजी महानगरपालिकाचे क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे, शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच रिंगण फिटनेस फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे…

Read More

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.85 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, वेंदगंगा नदीवरील- निळपण, वाघापुर, कुरणी, बस्तवडे व सुरुपली, कुंभी नदीवरील- सांगरुळ, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 6.85 (85 टक्के), तुळशी 2.26 (65 टक्के), वारणा 24.52 (71 टक्के), दूधगंगा 11.39 (45 टक्के), कासारी 1.85 (67 टक्के), कडवी 1.76 (70 टक्के),…

Read More

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुन उत्तीर्ण झालेल्या मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी, मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारूडी, मांग-गारोडी, मादगी व मादिंगा या 12 पोटजातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनींना जेष्ठता व गुण क्रमांकानुसार महामंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जापैकी प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थीनींनी 28 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ताराराणी…

Read More

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 18 जुन 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी तसेच संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.पी. जौंजाळ यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी संदर्भात माहिती दिली जाते. या योजनेअंतर्गत वैयक्तीक मधपाळ घटकांसाठी अर्जदार हा साक्षर असावा, त्याची स्वतःची शेती…

Read More

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 15 मे ते 31 जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर सादर करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन (Most Outstanding Person with Disabilities)’, ‘श्रेष्ठ दिव्यांगजन (Outstanding Person with Disabilities)’ आणि ‘श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका (Outstanding Creative Divyang Child)’ या उपवर्गांसाठी यूडीआयडी (UDID)…

Read More