कोल्हापूर दिनांक 24-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीने आर टी ई प्रवेश प्रक्रिया चौकशी प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.तसेच कोल्हापूर शहराच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.याबाबत सोमवार पासून कार्यवाही सुरू करू असा शब्द दिला आहे.
कोल्हापूर शहरातील खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे.या प्रकरणात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने शाळांमध्ये प्रवेश घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यामुळे संघटनेने सर्व प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम यांना निवेदन देण्यात आले असून महापौरांनी याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
