Author: admin

कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर २०२५ – पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेतील नर्सरी ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरबा आणि ढोल ताशाच्या तालावर नृत्य सादर केले. विविध गायन स्पर्धा,नृत्य स्पर्धा,रांगोळी, नृत्य आणि देवींच्या स्वरूपातील सादरीकरण विद्यार्थ्यांनी रंगतदार पद्धतीने सादर केल्या. शाळेच्या परिसरात देवीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुख्याध्यापिका शिल्पा कपूर,उपमुख्याध्यापिका मनीषा अंब्राळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे महत्व समजून घेण्यास मदत झाली.

Read More

नृसिंहवाडी ता.शिरोळ येथील दत्तमंदिर परिसरातील छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या धार्मिक परंपरा पुन्हा सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सनई-चौघडा, नगारा आणि इतर पारंपरिक कार्यक्रम बंद केल्याच्या निषेधार्थ ‘छत्रपती राजे प्रेमीं’ आणि सामाजिक कार्यकर्ते मोरया ग्रुप पुणे चे अध्यक्ष योगेश घुले व सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेते सागर धनवडे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद आहे की, शाहू महाराजांनी दत्तमंदिरातील आरती व पूजेच्या वेळी सनई-चौघडा आणि नगारा सुरू करण्याची परंपरा रुजवली होती. समता, श्रद्धा आणि लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या प्रथा सि. स. नं. ४६९ येथील त्यांच्या धर्मशाळा आणि नगारखान्यातून चालवल्या जात. ही जागा…

Read More

कोल्हापूर : प्रतिनिधी: शाही दसरा महोत्सवाला वेगळी ओळख आणि ऐतिहासिक वारसा आहे. यावर्षी राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवांमध्ये कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा समावेश केल्याने आपणा सर्वांचा हा सन्मान आहे. हा महोत्सव सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नवरात्र उत्सव आणि इतर विषयांबाबत पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा घेतला. महोत्सवाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माहिती दिली. यावेळी पालकमंत्री म्हणाले,…

Read More

कोल्हापूर दिनांक 17 – बोगस डिग्री देऊन नोकरी घेतल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर निलंबनासह पुढील कार्यवाही शासनाकडून सुरू असताना संबंधित शिक्षक आणि संस्था चालक हे संगनमताने तक्रारदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.त्या अनुषंगाने संस्थाचालकांच्या हा विषय जिव्हारी लागल्याने सूड भावनेने तक्रादाराला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते.त्याकामी राजकीय हस्तक्षेप होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थींना आता CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार (M0U) महामंडळाच्या मुख्य कार्यालयात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व CSC चे प्रमुख वैभव देशपांडे उपस्थितीत करण्यात आला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे राज्यातील सर्व लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही CSC केंद्रावर जाऊन महामंडळच्या योजनाचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे ,कागदपत्रे आपलोड करणे,योजनेची सध्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे. राज्यामध्ये CSC चे ७२ हजार पेक्षा जास्त केंद्र कार्यरत…

Read More

*कोल्हापूर, दि. ०८ (जिमाका)* : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले. ते म्हणाले, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक मार्गावर योग्य पद्धतीने उपाययोजना राबवा आणि शहरातील गर्दी टाळण्यासाठी बाहेर पुरेशी वाहनतळ व्यवस्था करा. याबाबत दोन दिवसात निर्णय घेवून जागा निश्चिती आणि आवश्यक कामे पूर्ण करा. नवरात्रोत्सवात करावयाच्या कामांच्या अनुषंगाने तसेच आवश्यक नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणाले, भाविकांना चांगल्या पध्दतीने दर्शन घेण्यासाठी रांगांची व्यवस्था करा, स्वच्छता विषयक कामांना सुरुवात करा,…

Read More

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनिवर्धकांचा वापर वर्षातील एकूण 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्याकरिता आदेश पारित केले आहेत. तथापि जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी या आदेशात दुरुस्ती केली असून गणपती उत्सव – दि. 4 सप्टेंबर 2025 तसेच ईद-ए-मिलाद – दि. 5 व 6 सप्टेंबर 2025 या दिवसांना सुट घोषित करण्यात आली आहे. 0000

Read More

पुणे दि 30 – येथील डॉ भारती चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अनुभवाची व्याप्ती लक्षात घेऊन तसेच मानिनी फाऊंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जाळे विस्तारलेल्या संस्थापक अध्यक्षा डू भारती चव्हाण यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ(भारत) व महा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशन महाराष्ट्र या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांवर कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यामुळे समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून येणाऱ्या काळात राज्यातील शेतकरी बांधवांसाठी भरीव कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.

Read More

कोल्हापूर दिनांक २८आज पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथ गणेशोत्सवाच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी उप-विभागीय पोलीस अधिकारी, शहर व करवीर उप-विभाग, पोलीस उप-अधीक्षक (गृह), कोल्हापूर शहर व परिसरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, जि. वि.शा. आणि स्था. गु.शा. यांचे उपस्थितीत कोल्हापूर शहर व परीसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व डी.जे. सिस्टीमचे मालक यांची बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी सदर बैठकीमध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील गणेश आगमन मिरवणूकीमध्ये ३२७ मंडळांनी डी. जे. लावून ध्वनी पातळी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे सांगितले. तसेच सदर उल्लंघनकर्त्या मंडळांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती दिली. तसेच दिनांक ०६/०९/२०२५ रोजी गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान…

Read More

कोल्हापूर* – मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्‍या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते कोल्हापूर येथील प्रेसक्लब येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे करवीर तालुकासंयोजक श्री. अशोक गुरव, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख श्री. दीपक देसाई, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे आणि हिंदु…

Read More