कोल्हापूर दिनांक २८आज पोलीस अधीक्षक कार्यालय, कोल्हापूर येथ गणेशोत्सवाच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी उप-विभागीय पोलीस अधिकारी, शहर व करवीर उप-विभाग, पोलीस उप-अधीक्षक (गृह), कोल्हापूर शहर व परिसरातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, जि. वि.शा. आणि स्था. गु.शा. यांचे उपस्थितीत कोल्हापूर शहर व परीसरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी व डी.जे. सिस्टीमचे मालक यांची बैठक घेण्यात आली.
पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी सदर बैठकीमध्ये कोल्हापूर शहर व परिसरातील गणेश आगमन मिरवणूकीमध्ये ३२७ मंडळांनी डी. जे. लावून ध्वनी पातळी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे सांगितले. तसेच सदर उल्लंघनकर्त्या मंडळांवर खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती दिली. तसेच दिनांक ०६/०९/२०२५ रोजी गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान ध्वनी पातळी मर्यादेचे उल्लंघन करणा-या गणेश मंडळांवर तसेच डी.जे. सिस्टीमचे मालक / चालक यांचेविरुध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. कोणत्याही डी.जे. सिस्टीम मालकांनी त्यांच्या साऊंड सिस्टीमध्ये ‘प्रेशर मिड’ तंत्राचा वापर करु नये. तसेच मंडळांनी डी.जे.समोर CO2 गॅसचा वापर करु नये. कोणत्याही मंडळांनी मिरवणूकीतील ट्रॅक्टरच्या बोनेटवर किंवा समोर नाचण्यासाठी बेस तयार करु नये. याबाबत सूचना देऊन सदर सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा याद्वारे देण्यात येत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) ने बनविलल्या गणेश मुर्तीचे विसर्जन करण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेली मार्गदर्शक सूचनांन्वये अशा मुर्तीचे विसर्जन पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत उदा.नदी, तलाव, विहिरी, झरे इत्यादी मध्ये न करता शासनाने / स्थानिक नगर पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या कृत्रिम तलावामध्ये करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.सर्व गणेशोत्सव मंडळे व डी.जे. सिस्टीम मालक / चालक यांनी यंदाचे गणेशोत्सवास पोलीसप्रशासनास सहकार्य करुन उत्सवाकरीता असलेल्या शासनाच्या तसेच या कार्यालयाकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन या उत्सवात कोणताही अनुचित प्रकार उद्भवणार
नाही याची दक्षता घेऊन शांततेत व थाटामाटात साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
