कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थींना आता CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रामधून महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार (M0U) महामंडळाच्या मुख्य कार्यालयात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख व CSC चे प्रमुख वैभव देशपांडे उपस्थितीत करण्यात आला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे राज्यातील सर्व लाभार्थी आता त्यांच्या जवळच्या कोणत्याही CSC केंद्रावर जाऊन महामंडळच्या योजनाचा लाभ कमी दरात घेऊ शकतील. यामध्ये महामंडळच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे ,कागदपत्रे आपलोड करणे,योजनेची सध्यस्थिती तपासणे आणि आवश्यक मार्गदर्शन मिळवणे यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
राज्यामध्ये CSC चे ७२ हजार पेक्षा जास्त केंद्र कार्यरत असल्याने त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या लाभार्थीना त्यांच्या गावातूनच प्रमाणपत्र (LOI) कागदपत्र, बँकेची कर्ज मंजूरी (bank sanction), बँकेचा हप्ता (bank statement) आपलोड करण्यासाठी सर्व कामासाठी प्रत्येकी 70/- रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. देशमुख यांनी दिली.
0000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
