Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. २७ (जिमाका) : परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये ऑटोरिक्षा / टॅक्सी परवान्यांचे खुल्या धोरणास स्थगिती देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. ऑटोरिक्षा / टॅक्सी नोंदणीसाठी ज्या अर्जदारांना इरादापत्र जारी करण्यात आले होते, परंतु त्या इरादापत्राची वैधता संपली आहे, अशा प्रकरणांत नोंदणी थांबवण्यात आली होती.* परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई इरादापत्राची वैधता संपलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना वाहन नोंदणी करिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इरादापत्राची वैधता संपलेल्या अर्जदारांनी २५ जून पर्यंत वाहनाची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांचे तर्फे करण्यात आले आहे.
कोल्हापूर, दि. २७* : मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून विशेष सखोल पुनरिक्षणानंतर दोषविरहित आणि अद्ययावत नवीन मतदार यादी अस्तित्वात येणार आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता तटस्थपणे आणि पारदर्शकतेने ही प्रक्रिया राबवावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना नष्टे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती…
कोल्हापूर, दि. २७ (जिमाका): कसबा बावडा येथील समाज कल्याण विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह मराठा कॉलनी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी या दोन्ही वसतिगृहांमध्ये प्रवेश सुरु झाले असून गरजू विद्यार्थिनीनी वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी वसतिगृहांच्या अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे*. वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org संकेतस्थाळाद्वारे होणार आहे. वसतिगृहात ८ वी पासून पुढे पास विद्यार्थीनीना शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थीनीना विनामूल्य प्रवेश असून त्यांना मोफत राहण्याची सोय, भोजन, संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा, स्पर्धापरीक्षा…
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत बुधवार, 27 मे रोजी सकाळी १०.१० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागलकडे प्रयाण सकाळी १०.३० वाजता कागल येथे आगमन व राखीव. राखीव-विविध बैठकांना उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम . गुरुवार २८ मे रोजी बकरी ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी राखीव. शुक्रवार २९ मे रोजी सकाळी ७ वाजता राखीव – सर्व नागरिकांच्यासाठी गाठीभेटी (स्थळ-निवासस्थान, कागल). सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत राखीव. सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर सीपीआर येथे विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-सीपीआर, कोल्हापूर). सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन…
कोल्हापूर, दि. २५ :* तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह इतर समिती सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात स्वतंत्र संरक्षण कक्ष स्थापन तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, ‘तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण’ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या निधीचा विविध कल्याणकारी उपक्रमांसाठी वापर करण्यात आलेल्या खर्चास…
कोल्हापूर, दि. २५*: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये पोलीस तपासावरील, कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेली, अर्थसहाय्यासाठीची तसेच न्यायालयीन प्रक्रियेतील प्रकरणांचा समावेश होता. पोलीस तपासावरील प्रकरणांना गती द्यावी आणि कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी महसूल विभागाची मदत घेऊन आवश्यक ते अर्थसहाय्य देण्यासाठी विहित मुदतीत प्रक्रिया राबवावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या. जानेवारी २०२६ पासून पोलीस विभागाकडून ३७ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल करून ती निकाली काढण्यात आली आहेत. तसेच, पोलीस तपासावर १४ प्रकरणे प्रलंबित असून चालू महिन्यात ५ नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. सध्या ५८९…
आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने प्रगती करत असताना दुसऱ्या बाजूला तंबाखूचे वाढते व्यसन समाजासमोर गंभीर आरोग्य संकट निर्माण करत आहे. गुटखा, पानमसाला, खर्रा, सिगारेट, बीडी तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन युवकांपासून प्रौढांपर्यंत चिंताजनक गतीने वाढताना दिसत आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘खोट्या आकर्षणाचा पर्दाफाश – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला चोख प्रत्युत्तर’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित केवळ जनजागृती न करता, समाजामध्ये तंबाखूविरोधी एक व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तंबाखू हे केवळ क्षणिक आनंदाचे व्यसन नसून ते तोंडाचा, घशाचा व फुफ्फुसांचा कर्करोग,…
कोल्हापूर, दि. 22 : हातकणंगले येथील वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सत्र 2026 साठी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण 124 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वीजतंत्री, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, शिट मेटल वर्कर आणि ड्रेस मेकिंग या सहा व्यवसायांचा समावेश आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती पुस्तिकेचे वाचन करून अर्ज भरावेत. अर्ज भरल्यानंतर मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज निश्चित करावेत. प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आयटीआयमध्ये किंवा हातकणंगले येथील शासकीय आयटीआयमध्ये थेट संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी…
कोल्हापूर, दि. 22: जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी यांनी केले आहे. योजनेचे प्रमुख घटक आणि अनुदान मर्यादा- नवीन सिंचन विहीर : 4 लाख रु., जुनी विहीर दुरुस्ती : 1 लाख रु., शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण : 2 लाख रु., इनवेल बोअरिंग : 40 हजार रु., सोलर पंप : 50 हजार रु., पंप संच…
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्किट हाऊसजवळ, ताराबाई पार्क येथील कुक्कूट प्रक्षेत्रावर सुधारित देशी कावेरी कोंबडीची खाण्याची व उबवणुकीची अंडी विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. उबवणुकीसाठीची अंडी प्रती नग 8 रुपये दराने, तर खाण्यासाठीची अंडी प्रती नग 4 रुपये दराने उपलब्ध आहेत. इच्छुक नागरिकांनी सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2651729 वर संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे. 0000