
कोल्हापूर, दि. 22 : हातकणंगले येथील वीर धनाजी जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सत्र 2026 साठी विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण 124 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये वीजतंत्री, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, शिट मेटल वर्कर आणि ड्रेस मेकिंग या सहा व्यवसायांचा समावेश आहे.
प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 मेपासून सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माहिती पुस्तिकेचे वाचन करून अर्ज भरावेत. अर्ज भरल्यानंतर मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अर्ज निश्चित करावेत.
प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जवळच्या आयटीआयमध्ये किंवा हातकणंगले येथील शासकीय आयटीआयमध्ये थेट संपर्क साधावा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य टी. एस. मिसाळ यांनी केले आहे.
0000