
कोल्हापूर, दि. २७ (जिमाका): कसबा बावडा येथील समाज कल्याण विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह मराठा कॉलनी व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी या दोन्ही वसतिगृहांमध्ये प्रवेश सुरु झाले असून गरजू विद्यार्थिनीनी वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी वसतिगृहांच्या अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे*.
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org संकेतस्थाळाद्वारे होणार आहे. वसतिगृहात ८ वी पासून पुढे पास विद्यार्थीनीना शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे मोफत प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थीनीना विनामूल्य प्रवेश असून त्यांना मोफत राहण्याची सोय, भोजन, संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबिरे, दरमहा निर्वाहभत्ता व इतर सुविधा वसतिगृहात दिल्या जाणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी ३० जून पर्यंत वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करावेत. प्रवेश प्रक्रिया अंतिम ७ जुलै तर इयत्ता ११ व १२ वी आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै पर्यंत वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करावेत. प्रवेश प्रक्रियेचा अंतिम दिनांक ३१ जुलै असा आहे. अशीच प्रक्रिया जिल्ह्यातील इतर वसतिगृहात राबविण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली.
00000
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.