
कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्किट हाऊसजवळ, ताराबाई पार्क येथील कुक्कूट प्रक्षेत्रावर सुधारित देशी कावेरी कोंबडीची खाण्याची व उबवणुकीची अंडी विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत.
उबवणुकीसाठीची अंडी प्रती नग 8 रुपये दराने, तर खाण्यासाठीची अंडी प्रती नग 4 रुपये दराने उपलब्ध आहेत. इच्छुक नागरिकांनी सोमवार ते शुक्रवार दुपारी 3 ते 5 या वेळेत केंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2651729 वर संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे.
0000